“मी त्याला रंगेहाथ पकडलं होतं”; दीपिकाचा गौप्यस्फोट

रिलेशनशिपमध्ये झालेल्या फसवणुकीवर व्यक्त झाली दीपिका

deepika
दीपिका पदुकोण

रिलेशनशिपमध्ये झालेल्या फसवणुकीवर अभिनेत्री दीपिका पदुकोण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त झाली. “मी त्याला रंगेहाथ पकडलं आणि त्यानंतर दुसरी संधीसुद्धा दिली. कारण मी त्याच्या प्रेमात फार आंधळी होती. त्याने माझ्याकडे माफीची भीख मागितली होती, विनवणी केली होती. म्हणून मी त्याला माफ केलं. मात्र या सर्व गोष्टींमधून बाहेर पडण्यासाठी मला फार वेळ लागला”, असं ती म्हणाली.

लग्नापूर्वीच्या अफेअरबद्दल दीपिका या मुलाखतीत बोलत होती. मात्र तिने कोणाचंही स्पष्टपणे नाव घेतलं नाही. ती पुढे म्हणाली, “माझ्यासाठी शारीरिक संबंध म्हणजे केवळ जवळीक नसून त्यात भावनासुद्धा गुंतलेल्या आहेत. मी कधीही कोणाची फसवणूक केली नाही किंवा कोणापासून काही लपवले नाही. जर कोणी माझी फसवणूक करत असेल तर मी अशा व्यक्तीसोबत का राहू? त्यापेक्षा मी सिंगलच राहणं पसंत करेन.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

पाहा फोटो : मालिकेत सावळी दाखवली जाणारी अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे इतकी सुंदर

दीपिकाचा बोलण्याचा रोख रणबीर कपूरकडे आहे, असा अंदाज या मुलाखतीवरून नेटकऱ्यांनी व्यक्त केला. रणवीर सिंगसोबत लग्न करण्यापूर्वी दीपिका व रणबीरचं नातं फार चर्चेत होतं. त्यांच्या नात्यासोबतच ब्रेकअपसुद्धा चर्चेचा विषय ठरला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Deepika padukone open up about betrayal in relationship ssv

ताज्या बातम्या