बॉलिवूडचा ‘बाजीराव’ अर्थात अभिनेता रणवीर सिंगचं अतरंगी फॅशन जगजाहीर आहे. कोणताही कार्यक्रम असो किंवा बाहेर फिरणं, रणवीरला नेहमीच चित्रविचित्र अंदाजात पाहिलं गेलं आहे. आपल्या फॅशन सेन्समुळे सतत चर्चेत राहणाऱ्या रणवीरला मात्र सासरी जाताना हमखास एक ड्रेसकोड पाळावा लागतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुद्द दीपिकाने याविषयी खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रणवीरला पदुकोण कुटुंबांच्या कार्यक्रमात जाताना किंवा दीपिकाच्या घरी सहज भेट देताना एक खास ड्रेसकोड ठरवून दिलेला आहे. रणवीरला त्यावेळी हेच कपडे परिधान करावे लागतात, असे दीपिकाने सांगितले. ”ज्यावेळी रणवीर माझ्या आई-वडिलांसोबत असतो त्यावेळी त्याला पांढरा शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स पँट असा ड्रेसकोड ठरवून दिलेला आहे. जर एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमाला त्याला जायचं असल्यास काळ्या किंवा निळ्या रंगाची पँट, पांढऱ्या रंगाचे शर्ट किंवा कोणत्याही रंगाचा गोल गळ्याचा टी-शर्ट घालून तो येऊ शकतो”, असं ती पुढे म्हणाली. बायकोवर जीवापाड प्रेम करणारा रणवीरदेखील आपल्या सासरी जाताना हा ड्रेसकोड आवर्जून पाळतो.

आणखी वाचा : प्रेग्नंसीविषयी दीपिका म्हणते, ”आम्हाला मुलं आवडतात पण..”

रणवीर-दीपिका हे लवकरच ऑनस्क्रीन एकत्र झळकणार आहेत. आगामी ‘८३’ या चित्रपटात रणवीर व दीपिका पती-पत्नीच्या भूमिकेत आहेत. १९८३ साली भारताने क्रिकेट विश्वात मिळवलेल्या विजयाची गाथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. यामध्ये रणवीर हा कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukone reveals that ranveer singh has a dress code when he attends padukone family events ssv
First published on: 11-10-2019 at 17:22 IST