चित्रपटसृष्टी हे एक असं क्षेत्र आहे जिथे यशाचं शिखर गाठताना तुम्हाला अनेक नातेसंबंधांना मागे सोडावं लागतं. खासगी आयुष्यातही बरेच त्याग करावे लागतात असं म्हटलं जातं. या क्षेत्रात राहून चांगली मैत्री, नातेसंबंध हाताळणं हे कठीणच आहे असं अनेकांचं मत आहे. बॉलिवूडची सध्याची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणसुद्धा असाच विचार करते. यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर रोमॅण्टिक नाती हाताळणे कठीण जाते, असं ती म्हणते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दीपिका गेल्या तीन वर्षांपासून अभिनेता रणवीर सिंगला डेट करत असल्याचं म्हटलं जातं. दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा अनेकदा बी-टाऊनमध्ये झाल्या. पुरस्कार सोहळा, कार्यक्रम, पार्टी यांमध्ये दोघांना एकत्र पाहिलं गेलं. तुम्ही स्टार असाल तर तुमच्या यशाला समजून घेणारा जोडीदार मिळणं अवघड होऊन जातं, असं मत दिपिकाने व्यक्त केलं.

VIDEO : जेव्हा ट्रिपल एच म्हणतो ‘रिश्ते में तो हम तुम्हारे…’

बॉलिवूडमधील या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये दीपिकानेही काही नाती गमावली आहेत. यासंदर्भात ती म्हणते की, ‘या नऊ वर्षांमध्ये काही मित्रमैत्रिणी माझ्यापासून दुरावले गेले. शाळेतील काही मित्रमैत्रिणी अजूनही संपर्कात आहेत. माझ्या वाट्याला आलेलं यश अनेकांना पाहावलं गेलं नाही आणि ते माझ्यापासून दूर गेले. मला त्याचं दु:ख नाही. प्रेमाच्या नातेसंबंधांचा विचार केला तर तुम्ही जे काही करत आहात ते समजून घेणारा, तुमच्या यशाला हाताळू शकणारा जोडीदार मिळणं कठीण असतं. त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त पैसे कमवत आहात, हे त्याने समजून घेतलं पाहिजे.’

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukone says its difficult to find someone who understands your success
First published on: 17-10-2017 at 20:39 IST