scorecardresearch

“तुम्ही प्लास्टिक सर्जरी केली आहे का?” प्रश्नावर अमृता फडणवीसांचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या, “मला ट्रोल केलं पण…”

झी मराठी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमामध्ये अमृता फडणवीस सहभागी होणार आहेत.

amruta fadnavis plastic surgery amruta fadnavis
"तुम्ही प्लास्टिक सर्जरी केली आहे का?" विचारताच अमृता फडणवीसांचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या, "मला ट्रोल केलं पण…"

‘झी मराठी’वर नुकत्याच सुरू झालेल्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे करत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या महिला या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली होती. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या ‘बस बाई बस’च्या पुढील भागामध्ये दिसणार आहेत.

आणखी वाचा – ‘लाल सिंग चड्ढा’ला होणाऱ्या विरोधावर कंगना रणौतची पोस्ट, म्हणाली, “…यामागे आमिर खानच”

‘बस बाई बस’मधील अमृता यांचे काही प्रोमो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. हे प्रोमो पाहिल्यानंतर या भागामध्ये त्या राजकीय परिस्थिती तसेच आपल्या खासगी आयुष्याबाबत भाष्य करताना दिसणार असल्याचं लक्षात येतं. अमृता सोशल मीडियावर बऱ्याच सक्रिय असतात. यादरम्यान त्यांना ट्रोलिंगचाही बराच सामना करावा लागतो. त्यांच्या लूकबाबत बोललं जातं. याबाबतच या कार्यक्रमामध्ये त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला.

“तुम्ही प्लास्टिक सर्जरी केली आहे का?” हा प्रश्न अमृता यांना विचारताच त्या म्हणाल्या, “चांगलं झालं तुम्ही हा प्रश्न मला विचारला. याबाबत मला अनेक लोकांनी ट्रोल देखील केलं आहे. प्लास्टिक सर्जरी करण्यासाठी खूप किंमत मोजावी लागते. याचा आणखी एक तोटा म्हणजे एकदा का चेहरा बिघडला की भविष्यकाळात तुम्हाला अडचण निर्माण होते. एक सांगते मी लग्नाआधी ब्युटी पार्लरला देखील जायचे नाही. त्यानंतरही लग्नामध्ये मेकअप करतात तोच मी केला होता. देवेंद्रजी पण असे आहेत की ते स्त्रीचा चेहरा नव्हे तर मन पाहतात.”

आणखी वाचा – Koffee With Karan 7 : “मुलं झाल्यानंतर सेक्स लाइफ बदलतं का?” करीना-आमिरचं उत्तर ऐकून करण जोहरची बोलती बंद

अमृता यांनी या प्रश्नाला हसतमुखाने अगदी सडेतोड उत्तर दिलं आहे. अमृता यांना गाण्याची प्रचंड आवड आहे. त्यांचे अनेक म्युझिक अल्बम देखील प्रदर्शित होतात. शिवाय वेगवेगळ्या लूकमधील फोटो त्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसतात. ‘बस बाई बस’मधील त्यांचा हा भाग अधिक चर्चेत असणार हे प्रोमोवरूनच लक्षात येतं.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-08-2022 at 09:00 IST
ताज्या बातम्या