अल्पना चौधरी

१९४३ साली धर्मदेव आनंद नावाचा तरुण पदवीधर लाहोरहून प्रदीर्घ प्रवास करुन मुंबईत उतरला. बघताक्षणीच हे शहर त्याला आवडलं. अभिनेता होण्याचं स्वप्न उराशी बाळगून हा तरुण तडफदार कार्यकर्ता मुंबानगरीत अवतरला तेही भर पावसात. त्या रट्टल रट्टल पडणाऱ्या पावसाचा पहिला अनुभव ‘द देव आनंद’ झाल्यावरही कधीच विसरला नाही. त्या वर्षी ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडतच राहिला, देव आनंद यांनी अनेक वर्षांदरम्यान एका मुलाखतीदरम्यान ही आठवण सांगितली. पाऊस पडत राहिला पण अभिनेता होण्याचा ध्यास विरला नाही.

MP Sanjay Singh says it is time to say goodbye to BJP
खासदार संजयसिंग म्हणतात, ‘भाजपला निरोप देण्याची वेळ’
Daighar Garbage, Daighar, Thane,
ठाणे : डायघर कचरा प्रश्न पेटणार, मतदानावर बहिष्कार घालण्याची तयारी
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
sangli lok sabha seat, nana patole, sanjay raut, congress, shivsena uddhav thackarey, lok sabha 2024, election 2024, maha vikas aghadi, conflict in maha vikas aghadi, maharashtra politics, maharashtra news, marathi news, sangli news, election news,
“संजय राऊत यांनी नाटके बंद करावी,” नाना पटोले यांचा सल्ला; म्हणाले, “त्यांनी छोट्या कार्यकर्त्यासारखे वागू नये…”

चित्रपट निर्मितीचं केंद्र असलेल्या मुंबईत येणं हा देव आनंद यांच्यासाठी विस्मयकारी अनुभव होता. भाऊ चेतन आनंद यांच्या मित्राच्या घरी राहण्याची व्यवस्था झाल्यानंतर देव आनंद यांनी गुरु अशोक कुमार यांचा किस्मत पाहण्यासाठी थिएटर गाठलं.

मुंबई शहराबद्दलचं नाविन्य आणि नवलाई थोडी कमी झाल्यावर देव आनंद यांनी काम शोधायला सुरुवात केली. परळमध्ये किंग एडवर्ड मेमोरिअल हॉस्पिटल म्हणजेच केईएम हॉस्पिटलसमोर एका चाळीत राहू लागले. वकिलाचा मुलगा आणि लाहोरमधल्या ख्यातनाम महाविद्यालयाचा पदवीधर असूनही मुंबईत असं राहताना देव आनंद यांना कमीपणा वाटला नाही.

आणखी वाचा: आनंदाची शंभरी..

मुंबईत येणाऱ्या आणि स्ट्रगल करणाऱ्या प्रत्येकाला मोठं व्हायचं असतं. देव आनंद यांनी त्या दिवसांबद्दल सांगितलं आहे. ते म्हणायाचे, ‘चाळीत राहावं लागतंय याचं मला काही वाटत नसे कारण माझ्यात खूप उत्साह होता आणि स्वप्नं मला साद घालत होती. अनेकदा माझ्याकडे कवडीदेखील नसे’. काम नाही, त्यामुळे पैसा नाही अशा अवस्थेत देव आनंद यांना त्यांनी निगुतीने जतन केलेलं स्टँपचं कलेक्शन हॉर्नीबी रोडवर विकून टाकलं. जेणेकरुन थोडे पैसे मिळतील.

देव आनंद यांनी मुंबई शहर बस आणि ट्रामच्या माध्यमातून पालथं घातलं. या शहराचा सतत धावतं राहण्याचा आणि हार न मानण्याचा गुण त्यांनी तिथूनच अंगीकारला. पण पैशाची निकड होती. हे जाणून देव आनंद यांनी मिलिटरी सेन्सर्स ऑफिसात नोकरी स्वीकारली. या नोकरीमुळे फोर्ट परिसरात विंडोशॉपिंग न करता थोडी खरेदी करता येऊ लागली. प्रसिद्ध पारशी डेअरीत कॉफी पिण्याची इच्छा या नोकरीमुळेच पूर्ण झाली. काही काळानंतर पुण्यातल्या प्रभात स्टुडिओने देव आनंद यांच्यातल्या गुणवत्तेला हेरलं आणि अभिनेता म्हणून तीन वर्ष करारबद्ध केलं. देव आनंद यांनी त्यानंतर मागे वळून पाहिलंच नाही.

आणखी वाचा: इंदिरा गांधींनी लावलेल्या आणीबाणी विरोधात देव आनंद यांनी काढलेला थेट स्वतःचाच पक्ष

अनेक वर्षांनी देव आनंद मुंबईत परतले आणि ‘४१ पाली हिल, वांद्रे’ इथे भावाबरोबर राहू लागले. तोवर तोही मुंबईत स्थायिक झाला होता. या खेपेस गुरुदत्त या महत्त्वाकांक्षी दिग्दर्शकाच्या साथीने त्यांनी मुंबईचा कानोसा घेतला. मुंबईच्या बेस्ट बसेस आणि लोकलमधून देव आनंद मुंबईचा कानाकोपरा धुंडाळत. मुंबईत मोजक्याच ठिकाणी हॉलिवूडचे चित्रपट लागत. देव आनंद त्या चित्रपटांचा आस्वाद घेत. ते सांगायचे, ‘गुरु आणि मी शहरभर फिरायचो, मग चित्रपट पाहायचो आणि कॉफी पिऊन घरी परतायचो. काहीवेळेला आम्ही पाली हिलवरच्या गोल्फ लिंक्स या ठिकाणी जायचो. तो परिसर सुंदर आणि शांत असा होता. मी मुंबईचे रस्ते, गल्ल्या हिंडलो आहे, अक्षरक्ष: कोळून प्यायलो आहे. हे शहर माझ्या धमन्यांमध्ये साठलं आहे. हे शहर माझ्यात कणाकणाने वाढतं आहे. तुम्ही कामापरत्वे जगात कुठेही जा. तुम्हाला हे शहर परत बोलावतं. खुणावतं’. मुंबईविषयी बोलताना देव आनंद यांच्या डोळ्यात वेगळीच चमक जाणवायची.

स्वप्नगरीत दाखल झालेला तो तरुण स्टार कसा झाला याची कहाणी अनोखी आहे. देव आनंद सांगतात, ‘एकेदिवशी मी लोकल ट्रेन पकडण्यासाठी स्टेशनवर आलो. कोणीतरी मला आतून हाक मारली. दिग्दर्शक शाहीद लतीफ आणि त्यांचे लेखक इस्मत चुगतई तेच मला बोलावत होते. माझ्या पुढच्या चित्रपटात बॉम्बे टॉकीजसाठी काम करशील का असं लतीफ यांनी विचारलं. मी त्वरित होकार भरला’. लोकल ट्रेनमध्ये एका होतकरु तरुणाला काम मिळणं हे मुंबईच्या श्रमिक संस्कृतीचं द्योतकच म्हणायला हवं. मुंबई याच खुल्या आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनासाठी ओळखली जाते.

उत्साहाने मुसमुसलेल्या स्थितीत देव आनंद यांनी मालाडला जाणारी लोकल पकडली. तिथे उतरून बॉम्बे टॉकीजला जायला टांगा घेतला. तिथे पोहोचून त्यांनी ‘जिद्दी’ या चित्रपटासाठीच्या करारावर स्वाक्षरी केली. ते वर्ष होतं १९४८. चित्रपटात पदार्पण आणि हळूहळू स्थिरावल्यानंतर देव आनंद यांनी जुहूत घरासाठी जमीन घेतली. शेवटपर्यंत ते तिथेच राहिले.

देव आनंद यांची लोकप्रियता वाढू लागली तसं त्यांचं शहराविषयचं प्रेमही बहरतच गेलं. त्यांच्या चित्रपटात मुंबई हमखास दिसायची. १९५४ साली प्रदर्शित झालेल्या टॅक्सी ड्रायव्हर चित्रपटात मुंबई शहराचा उल्लेख क्रेडिट्समध्ये आवर्जून दिसतो. चित्रपटातली मध्यवर्ती भूमिका साकारताना देव आनंद मरिन ड्राईव्हवरुन गाडी घेऊन जाताना दिसतात. दक्षिण मुंबईतल्या आर्ट डेको धाटणीच्या वास्तूंना साक्षी ठेऊन जाताना दिसतात. कधी ते गेटवे ऑफ इंडियासमोर दिसतात तर कधी वरळी सीफेसला लाटांचं तांडव पाहताना दिसतात. कधी जुहू किनाऱ्यावरच्या झाडांच्या छायेत दिसतात. दिग्दर्शक व्ही. रात्रा यांनी कृष्णधवल रंगात मुंबईच्या बहुढंगी छटा सुरेखपणे टिपल्या आहेत.

मुंबईसारखं शहर संपूर्ण जगात कुठेच नाही असं देव आनंद म्हणायचे. मुंबईची मानसिकता छोट्या शहराची नाही. हे शहर नानाविध जाती, धर्म, पंथ, वंशाच्या माणसांनी व्यापलं आहे. खऱ्या अर्थाने कॉस्मोपॉलिटन आहे. हे सुंदर शहर होतं जिथे माणसं पोटाची खळगी भरायला येत.

देव आनंद यांच्या मनातलं मुंबईबद्दलचं प्रेम एकांगी नव्हतं. या शहराची दुसरी बाजूही आहे हे त्यांना ठाऊक होतं. त्यांचे बंधू विजय आनंद यांच्या १९६० मध्ये प्रदर्शित झालेल्या काला बाझारमध्ये रमणीय नसलेली मुंबई दिसली होती.

राजकारणी आणि द्रष्टेपण नसलेले प्रशासक यामुळे मुंबईची रयाच हरपली. हे पाहताना देव आनंद यांना अतीव दु:ख होत असे. ते म्हणायचे, ‘ठराविक वर्षांनी नवीन माणसं सत्तेत येतात. त्यांची संकुचित मनोवृत्ती दाखवतात. शहराचं अपरिमित नुकसान करणारे निर्णय घेतात आणि मग गायब होतात. शहराचा आत्माच हरवून टाकला आहे या लोकांनी’, असं एकदा देव आनंद मी १९८७ मध्ये घेतलेल्या मुलाखतीत खेदाने म्हणाले होते.

(‘देव आनंद-डॅशिंग देबनॉर’ हे २००४ मध्ये प्रकाशित पुस्तक अल्पना चौधरी यांनी लिहिलं आहे)