सध्या लॉकडाउनमुळे सर्वचजण आपापल्या घरात अडकून पडले आहेत. यामध्ये बॉलिवूड कलाकारांचा देखील समावेश आहे. त्यामुळे कलाकार मिळालेल्या वेळात सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. नुकताच बॉलिवूडची क्यूट गर्ल आलिया भट्टने देखील सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे ती चर्चेत आहे.
आलियाने तिचा जिममध्ये वर्कआऊट करतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आलियाने हेअर कट केल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करत आलियाने ६० दिवसांनंतर वर्कआउट केल्यानंतर खूप बरे वाटत आहे अशा आशयाचे कॅप्शन तिने दिले आहे.
दरम्यान तिने कॅप्शनमध्ये मी माझे केस घरीच कापले आहेत असे म्हटले आहे. तिचे हे कॅप्शन वाचून चाहत्यांमध्ये आलियाचे केस रणबीरने कापले असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. लॉकडाउनमध्ये रणबीर आणि आलिया एकत्र राहत असून एकत्र वेळ घालवत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आलियाच्या फोटोवर सोशल मीडियावर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
बॉलिवूडमधील हे रिअल लाइफमधील कपल लवकरच मोठ्या पडद्यावर देखील एकत्र पाहायला मिळणार आहेत. आलिया आणि रणबीर ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात एकत्र काम करताना दिसत आहेत. हा चित्रपट २० डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या व्यतिरिक्त आलिया गंगूबाई काठियावाडी या चित्रपटात देखील दिसणार आहे.