Video: केदार शिंदेने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, पाहा ‘लॉकडाउन लग्नसोहळा’

केदार शिंदेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय दिग्दर्शक, लेखक केदान शिंदेने लॉकडाउनच्या काळाच दुसऱ्यांदा लग्न केले. त्याच्या लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे केदारने काही मोजक्याच लोकांच्या उपस्थित पुन्हा लग्न केले. आता त्यांच्या लग्न सोहळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

केदाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नातील व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांने ‘हा खुप खास व्हिडीओ आहे. आमच्या लग्नाला २५ वर्ष पुर्ण झाली. २५ वर्षांपूर्वी आम्ही पळून जाऊन लग्न केलं. त्यावेळी कोणतेही विधी झाले नाहीत. २५ वर्षांनंतर आमची मुलगी सना हीने शास्त्रशुद्ध लग्न करायचं ठरवलं. पण लॉकडाउमुळे काही शक्य नव्हतं’ या आशयाचे कॅप्शन दिले.

Photos: सोनाली कुलकर्णीचे दुबईतील आलिशान घर पाहिलेत का?

 

View this post on Instagram

 

A post shared by Kedhar Shindde (@kedaarshinde)

पुढे तो म्हणाला, ‘आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर, प्रशांत गावकर, रंजित गावकर, सोहम बांदेकर यांच्या मदतीने सनाने पूर्ण तयारी केली. ९ मे रोजी हा घरगुती समारंभ पार पडला. ९ मे १९९६ रोजी ७५०/- रुपयांत लग्न केलं. २५ वर्षांनंतर आत्ताचं लग्नसुद्धा लॉकडाउनमुळे फारच आटोक्यात पार पडलंय. या दिवसात खरंच काही परवडत नाही. पण आयुष्यात सकारात्मक राहायचं असेल तर काही तरी करायलाच हवं. आपल्या शुभेच्छा, आशिर्वाद सतत सोबत राहू द्या.’

९ मे रोजी केदार शिंदेने दुसऱ्यांदा लग्न केले. या लग्नसोहळ्याला काही कलाकारसुद्धा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून उपस्थित होते. त्यांच्या लग्नसोहळ्यातील फोटो व्हायरल झाले होते. आता लग्नाचा व्हिडीओ चर्चेत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Director writer kedar shinde got married again video viral avb

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या