दिव्यांका त्रिपाठी हे नाव आता छोट्या पडद्यासाठी नवीन राहिलेलं नाही. टेलिव्हिजन क्षेत्रातील दिव्यांका आघाडीची अभिनेत्री आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांची संख्यादेखील प्रचंड आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी दिव्यांका सोशल मीडियावर सतत अॅक्टीव्ह असते. दिव्यांका अनेक वेळा तिचे काही फोटो किंवा व्हिडिओज चाहत्यांसोबत शेअर करत असते. मात्र काही दिवसांपूर्वी दिव्यांकाने शेअर केलेल्या फोटोमुळे तिच्यावर ट्रोल होण्याची वेळ आली आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाचीला तिने कॉपी केल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसापूर्वी दिव्यांकाने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. याप्रसंगाचे काही फोटो दिव्यांकाने सोशल मीडियावर शेअर केले होते. शेअर केलेल्या फोटोमध्ये दिव्यांकाने व्हाईट गोल्डन रंगाचा गाऊन परिधान केला होता. या गाऊनवर तिने एक बेल्टही लावला होता. हा बेल्ट पाहुन नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

फॅशन डिझायनर सब्यासाचीच्या प्रत्येक ड्रेसवर त्याचा रॉयल बंगाल टायगरचा ट्रेडमार्क असतो. दिव्यांकाने परिधान केलेल्या बेल्टवरही असाच रॉयल बंगाल टायगरचा लोगो होता. त्यामुळे दिव्यांकाने सब्यासाची यांची डिझाइन कॉपी केल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ‘मी जो बेल्ट घातला होता.तो कोणत्या तरी ब्रॅण्डचा ट्रेडमार्क आहे हे मला माहित नव्हतं.जेव्हा एका नेटकऱ्याने मला या विषयी विचारलं त्यावेळी मला या ट्रेडमार्कविषयी समजलं. पण झालेल्या या प्रकारामुळे मी मनापासून साऱ्याची माफी मागते’, असं दिव्यांकाने पोस्ट करुन नेटकऱ्यांची माफी मागितली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Divyanka tripathi trolled over plagiarising sabyasachi mukherjees trademark belt
First published on: 01-02-2019 at 17:18 IST