लोकप्रिय पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नुकताच ढाका इथं त्याचा एक कॉन्सर्ट पार पडला, त्यातील हा व्हिडीओ आहे. या कॉन्सर्टमध्ये आतिफला भेटायला त्याची एक चाहती थेट स्टेजवर पोहोचली आणि त्याला मिठी मारली, नंतर त्याने केलेल्या कृतीने लक्ष वेधून घेतलं आहे.

व्हिडीओत दिसतंय की स्टेजवर आतिफ अस्लम उभा आहे, तिथे पोहोचलेली चाहती त्याला मिठी मारण्याचा प्रयत्न करतेय. आतिफ तिचे हात पकडतो आणि तिच्याशी बोलतो. अचानक ती तिथे पोहोचल्याने गोंधळून न जाता आतिफने परिस्थिती काळजीपूर्वक हाताळली आणि तिला सांभाळलं.

यामी गौतमच्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेसने काय वाटोळं…”

एका एक्स युजरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसतंय की ही चाहती आतिफला मिठी मारताना भावुक होते. आतिफने हळूवारपणे तिची मिठी सोडवण्याचा प्रयत्न केला तरीही तिने घट्ट धरून ठेवलं. मग तो तिच्याकडे बघून असतो आणि तिच्याशी बोलतो, तिला मिठी मारतो. ती चाहती त्याला आय लव्ह यू म्हणत मिठी मारते व त्याच्या हाताचं चुंबन घेते. मग तिथे दोघेजण मंचावर येतात आणि तिला स्टेजवरून खाली उतरवतात.

हा व्हिडीओ पाहून नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी या चाहतीवर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी केली आहे. तर काहींनी आतिफ खूप नम्र असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, आतिफचा हा व्हिडीओ पाहून काही नेटकरी त्याचं कौतुक करत आहे. भावुक झालेल्या चाहतीला त्याने मंचावर ज्या प्रकारे कोणताही त्रागा न करता सांभाळून घेतलं ते कौतुकास्पद असल्याचं अनेकजण म्हणत आहेत.