मराठी रंगभूमीला गौरवशाली परंपरा लाभली आहे. अनेक प्रतिभावान नाटककारांनी, लेखक, दिग्दर्शकांनी आपल्या वैविध्यपूर्ण नाट्यकृतींनी प्रेक्षकांची मने जिंकत रंगभूमीचा एक काळ अक्षरशः गाजवला. पण आता सिनेमा, मालिकांच्या जगात नाटक कुठेतरी मागे पडतंय, असंच अनेकांना वाटत आहे. तरुण पिढी काही नाटकांकडे वळत नाही अशी तक्रार अनेकांकडून येत असते. पण, वर्तमानपत्रातल्या जाहिराती पाहिल्या की नवनवीन येणाऱ्या नाटकांच्या जाहिरातीच हे सर्व किती फोल आहे हे दाखवून देतात. नुकतेच ‘अपराध मीच केला’ हे जुने नाटक नव्या रुपात रंगभूमीवर आले. या नाटकातल्या आपल्या अनुभवाबद्दल सांगतेय अभिनेत्री निशा परुळेकर…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मी नाटकात काम करायला सुरुवात तशी उशिराच केली. मधल्या काळात मी कोणत्याच नाटकात काम केले नाही. ‘सही रे सही’ या नाटकात मी एक बदली कलाकार म्हणून काम केलं होतं. त्यामुळे अनेक दिवसांपासून मी एखाद्या विनोदी नाटकाच्या शोधात होते. पण विजय गोखले यांनी ‘अपराध मीच केला’ या नाटकाची संहिता मला वाचायला दिली, तेव्हा मी या नाटकाच्या प्रेमातच पडले. या नाटकातले प्रत्येक संवाद खरंच खूप सुंदर आहेत. मधुसूदन कालेलकरांनी हे नाटक फार सुरेख लिहिलं आहे. नाटक वाचून झाल्यावर मी लगेच विजय गोखलेंना फोन केला आणि या नाटकात काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Exclusive katha padyamagchi nisha parulekar talks about her experience in aparadh mich kela
First published on: 22-03-2017 at 12:24 IST