फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता हिने तिचा चित्रपट निर्माता पती मधू मंतेना याच्यासोबतच्या वैवाहिक नात्यातून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. मसाबाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन याविषयीची माहिती देत मधूसोबतच्या नात्यातून आपण विभक्त होत असल्याचं स्पष्ट केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मला ही बाब सांगण्यास अतिशय दु:ख होत आहे. पण, मधू आणि मी आमच्या नात्यातून विभक्त होण्याचा निर्णय घेत आहोत. अनेकांशी आणि आमच्या कुटुंबियांशी चर्चा केल्यानंतरच आम्ही या निर्णयावर पोहोचलो आहोत. सध्याच्या घडीला वैवाहिक आयुष्यातून वेळ काढत स्वत:ला काय हवं आहे हे ठरवण्यासाठी आम्ही या नात्यातून काही काळासाठी विभक्त होत आहोत’, असं तिने या पोस्टमध्ये लिहिलं. हा काळ आम्हा दोघांसाठी खूप कठीण असून, आमच्या खासगी आयुष्याविषयी गोपनीयता पाळली जाईल अशीच अपेक्षा आहे, असं म्हणत सध्याच्या घडीला आम्ही कोणालाही उत्तर देण्याच्या मनस्थितीत नसल्याचंही तिने या पोस्टमधून स्पष्ट केलं.

वाचा : Priyanka Chopra Nick Jonas Engagement : निकसोबत प्रेमाचा महाल उभा कर.. आईचा आपुलकीचा सल्ला

सेलिब्रिटी विश्वात मसाबा आणि तिच्या पतीच्या वैवाहिक आयुष्यात आलेल्या या वादळाविषयीच चर्चा सुरु आहे. मसाबा ही अभिनेत्री नीना गुप्ता आणि वेस्ट इंडिजचे निवृत्त क्रिकेटपटू सर विवियन रिटर्ड्स यांची मुलगी आहे. २०१५ मध्ये तिने आणि मधूने लग्नगाठ बांधली होती. पण, काही कारणास्तव त्यांच्या या नात्यात वादळ आलं असून, आता ते दोघंही काही काळासाठी विभक्त होण्याच्या निर्णयावर पोहोचल्याचं कळत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fashion designer masaba gupta and husband madhu mantena announce trial separation after 3 years of marriage
First published on: 26-08-2018 at 14:23 IST