‘फास्ट अ‍ॅण्ड फ्युरियस’ ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय हॉलिवूड फ्रेंचाईजींपैकी एक म्हणून ओळखली जाते. या चित्रपट मालिकेतील ‘फास्ट अ‍ॅण्ड फ्युरियस-९’ हा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा मालिकेतील नवना चित्रपट आहे.

‘फास्ट अ‍ॅण्ड फ्युरियस’मध्ये आपण आतापर्यंत ड्वेन जॉन्सन, पॉल वॉकर, जेसन स्टॅथम यांसारख्या अनेक कलाकारांना स्टंटबाजी करताना पाहिले आहे. यावेळी अ‍ॅक्शनस्टार विन डिझलबरोबर WWE सुपरस्टार जॉन सिना देखील अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट येत्या १८ डिसेंबरला इंग्रजीबरोबरच हिंदी, तामिळ आणि तेलुगु या भाषांमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे.

काय आहे ‘फास्ट अँड फ्युरियस’?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘फास्ट अ‍ॅण्ड फ्युरियस’ ही एक अ‍ॅक्शनपट मालिका आहे. या चित्रपटातील कलाकार वेगवान गाड्यांचा वापर करुन कोट्यवधींच्या चोऱ्या करतात. यावेळी पोलीस आणि चोरांमध्ये रंगलेला लपंडाव या चित्रपटांमध्ये दाखवला जातो. जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स, फाईट आणि वेगवान गाड्यांच्या स्टंटबाजीमुळे ‘फास्ट अ‍ॅण्ड फ्युरियस’ ही चित्रपट मालिका भारतात प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेतील नववा भाग आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.