कलाविश्वामध्ये समर्पक वृत्तीने काम करणाऱ्या कलाकाराला पुरस्कार रुपाने त्याच्या कामाची पोचपावती मिळत असते. या कलाकारांच्या कामाचं कौतुक व्हावं यासाठी चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजन विश्वामध्ये अनेक वेळा विविध पुरस्कारांचं आयोजन करण्यात येत असतं. यातील फिल्मफेअर या मानाच्या पुरस्कार सोहळ्याची सारेच कलाकार आतुरतेने वाट पाहत असतात. चित्रपटसृष्टीत प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘फिल्मफेअर पुरस्कार २०१९’ चा सोहळा नुकताच पार पडला. यावेळी कलाविश्वातील अभिनेत्रींचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळालाच त्यासोबतच अनेक चित्रपटांना, कलाकारांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मुंबईमधील जिओ गार्डन येथे रंगलेल्या या सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध मंडळी उपस्थित होते. तसेच जान्हवी कपूर, रणवीर सिंग यांसारख्या कलाकारांनी त्यांचे परफॉर्मन्स सादर करत या सोहळ्याची रंगत वाढविली. या पुरस्कार सोहळ्यात ‘बधाई हो’, ‘राझी’, ‘अंधाधुन’, ‘संजू’, ‘पद्मावत’ या सुपरहिट चित्रपटांमध्ये चुरस पाहायला मिळाली. मात्र अखेर आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेल्या ‘राझी’ने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला. याप्रमाणेच अनेक चित्रपट दिग्दर्शक, कलाकार यांनादेखील पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. चला तर मग पाहुयात विजेत्यांची यादी. –

पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक -मेघना गुलजार (स्त्री)
सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक) – अंधाधुन
सर्वोत्कृष्ट अभिनेता – रणबीर कपूर (संजू)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक)- रणवीर सिंग (पद्मावत), आयुष्मान खुराणा (अंधाधुन)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – अलिया भट (राझी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक)- नीना गुप्ता (बधाई हो)
सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता- गजराज राव (बधाई हो), विकी कौशल (संजू)
सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री- सुरेखा सिक्री (बधाई हो)
सर्वोत्कृष्ट पदार्पण (पुरुष)- ईशान खट्टर
सर्वोत्कृष्ट पदार्पण (स्त्री)- सारा अली खान<br />सर्वोत्कृष्ट पदार्पण (दिग्दर्शक)- अमन कौशिक (स्त्री)
सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बम- पद्मावत (संजय लीला भन्साळी)
सर्वोत्कृष्ट गीतकार- ऐ वतन (गुलजार-राझी)
सर्वोत्कृष्ट गायक – अर्जित सिंग (ए वतन-राझी)
सर्वोत्कृष्ट गायिका- श्रेया घोषाल (घुमर-पद्मावत)
सर्वोत्कृष्ट कथा- मुल्क (अनुभव सिन्हा)
सर्वोत्कृष्ट पटकथा- अंधाधुन (श्रीराम राघवन, अर्जित बिस्वास, पूजा सुरती, योगेश चांदेकर, हेमंत राव)
सर्वोत्कृष्ट संवाद- बधाई हो (अक्षत घिलडील)
सर्वोत्कृष्ट एडिटिंग- पूजा सुरती (अंधाधुन)
सर्वोत्कृष्ट अॅक्शन – विक्रम दहीया आणि सुनील रॉड्रीक्स (मुक्काबाज)
सर्वोत्कृष्ट बॅकराऊंड स्कोर- अंधाधुन (डॅनियल. बी. जॉर्ज)
सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी- कृती महेश मिड्या, ज्योती डी तोमर (घुमर – पद्मावत)
सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफी- पंकज कुमार (तुंबाड)
सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन- नितीन झियानी चौधरी, राकेश यादव (तुंबाड)
सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाईन- कुणाल शर्मा (तुंबाड)
सर्वोत्कृष्ट वीएफएक्स- रेड चिलीज (झीरो)