अभिनेता हृतिक रोशन आणि यामी गौतम यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणारा ‘काबील’ हा चित्रपट गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. अशा या बहुचर्चित चित्रपटातील पहिले गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. हृतिक रोशनने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन या गाण्याची लिंकही शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘काबिल हू..’ असे बोल असणाऱ्या या गाण्याविषयी ट्विटरवरही मोठ्या प्रमाणावर बोलले जात आहे. #KaabilHoon असा हॅशटॅगही ट्रेंडमध्ये आला आहे. नासिर फराज यांनी लिहिलेल्या या गाण्याला राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केले आहे. जुबैल नौटीयाल आणि पलक मुछाल यांच्या सुमधूर आवाजात हे गाणे स्वरबद्ध करण्यात आले आहे. हृतिक आणि यामीचे निरागस आणि तितकेच वेगळे रुप या गाण्यामध्ये पाहायला मिळत आहे. ‘काबिल’ या चित्रपटामध्ये हृतिक आणि यामी नव्या भूमिकेद्वारे प्रेक्षकांची दाद मिळविण्यासाठी सज्ज झाले आहेत. हसतखेळत सर्वसामान्य जीवन जगणाऱ्या एका व्यक्तिच्या जीवनामध्ये काही कारणास्तव जेव्हा संकटांचे वादळ येते त्यावेळी डोक्यात सतत सूडबुद्धीचे वारे वाहत असल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये कोणकोणती वळणं येतात असे एकंदर कथानक या चित्रपटामध्ये साकारण्यात आले आहे. राकेश रोशन निर्मित आणि संजय गुप्ता दिग्दर्शित ‘काबिल’ हा चित्रपट २५ जानेवारी २०१७ ला प्रदर्शित होणार आहे. हृतिक आणि यामी गौतम व्यकिरिक्त या चित्रपटामध्ये अभिनेता रोनित आणि रोहित रॉय खलनायकी भूमिकेत झळकणार आहेत.

वाचा: चित्रपट प्रदर्शनाचा वाद, शाहरुख खानवर राकेश रोशन नाराज

दरम्यान, २६ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण, त्याच दिवशी शाहरुख खानचा ‘रईस’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार असल्यामुळे एक दिवस आधीच म्हणजे २५ जानेवारीला ‘काबिल’ प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांची टक्कर टळणार असेच चित्र दिसत असताना शाहरुख खानच्या रईसचा ट्रेलर प्रदर्शित झाला त्याचवेळी २५ जानेवारी रोजी आपण हा चित्रपट प्रदर्शित करणार असल्याचे शाहरुखने जाहीर केले. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखांवरुन आता या दोन्ही मोठ्या चित्रपटांमध्ये वादाची ठिणगी पेटल्याचे वृत्त आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First video song kaabil hoon from the upcoming bollywood movie kaabil
First published on: 08-12-2016 at 10:57 IST