शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावर मुंबईतील किल्ला न्यायालयात सुनावणी झाली. क्रूज पार्टीमध्ये ड्रग्जच्या प्रकरणामुळे आर्यन खानच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत. सांगितले जात आहे की आता आर्यनचे वकील जामीनासाठी सत्र न्यायालयात जाऊ शकतात. दरम्यान, गौरी खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती रडताना दिसत आहे.

गौरी खान मुलगा आर्यन खानला भेटायला एनसीबी ऑफिसमध्ये गेली होती. त्यावेळी गौरीसोबत शाहरुखची मॅनेजर पूजा दादलानी देखील हजर होती. व्हिडीओमध्ये गौरी खान गाडीमध्ये बसलेली दिसत आहे. तिला अश्रू अनावर झाल्याचे दिसत आहे.
आणखी वाचा : सेटवर २५ बाउंसर आणि व्हॅनिटी तयार, पण शाहरुखने अजय देवगणसोबत चित्रीकरणास दिला नकार

upsc student surprised father with upsc 2023 result in his office then what happened you will get cry watch viral video
या आनंदाला तोड नाही! UPSC निकालानंतर वडिलांच्या ऑफिसमध्ये पोहोचला लेक अन्…; VIDEO पाहून पाणावतील तुमचेही डोळे
Puppy beaten, Pimpri,
Video : पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
a young boy denied entry to bank of India branch for wearing shorts video goes viral
Nagpur Video: हा कोणता नियम! शॉर्ट पॅन्टमुळे बँकेत No Entry; नागपूरच्या तरुणाचा व्हिडीओ होतोय व्हायरल..
Pakistani man receive a gift of ancestral home door from India
याला म्हणतात मैत्री! पाकिस्तानी मित्राला पाठवला घराचा दरवाजा, १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदा दरवाजा पाहून…; व्हिडीओ होतोय व्हायरल

आर्यन खान आणि इतर आरोपींना आर्थर जेलमध्ये ३-५ दिवस क्वारंटाईन सेलमध्ये ठेवले जाईल. मात्र, करोना तपासणीत प्रत्येकाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. परंतु जेव्हाही या तुरुंगात नवीन आरोपी येतो, तेव्हा त्यांना काही दिवस क्वारंटाईन सेलमध्ये ठेवले जाते. न्यायालयातच सुनावणीदरम्यान वैद्यकीय तपासणीनंतर आरोपींना आर्थर जेलमध्ये आणण्यात आले.

मुंबईच्या किल्ला कोर्टाने गुरुवारी आर्यन खानसह सर्व आठ आरोपींना ड्रग्ज प्रकरणात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तपास यंत्रणा एनसीबीने कोर्टाकडे ११ ऑक्टोबरपर्यंत रिमांड वाढवण्याची मागणी केली होती. पण न्यायालयाने ती फेटाळली. आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांनी ताबडतोब जामीन अर्ज दाखल केला पण संध्याकाळी ७ नंतर न्यायालयाने सुनावणीस नकार दिला. या प्रकरणाची शुक्रवारी सुनावणी झाली पण आर्यनला जामीन मिळू शकला नाही.