‘ग्रॅव्हिटी’ हा इतिहासातील सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटानं एक दोन नव्हे तर तब्बल सात ऑस्कर पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं होतं. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी जवळपास ७०० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. यावरुनच या चित्रपटाचा आवाका आपल्या लक्षात येतो. लक्षवेधी बाब म्हणजे या चित्रपटाच्या निर्मितीसाठी अभिनेता जॉर्ज क्लूनी याने देखील १४ मिलिअन डॉलर्सची म्हणजेच जवळपास ७४ कोटी २९ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. अन् हा चित्रपट यशस्वी होताच मिळालेल्या एकूण रकमेपैकी ७४ कोटी रुपये त्याने आपल्या १४ मित्रांमध्ये वाटले.

अवश्य वाचा – ‘प्रेम करण्यापूर्वी धर्म पाहायचा का?’; ‘लव्ह जिहाद’च्या कायद्यावर अभिनेता संतापला

२०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘ग्रॅव्हिटी’ या चित्रपटाला सात वर्ष पूर्ण झाली आहेत. या चित्रपटाच्या सातव्या वाढदिवसाच्या निमित्तानं अभिनेता जॉर्ज क्लूनी याने GQ मॅगझिनला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने हा १४ मिलियन डॉलर्सचा किस्सा सांगितला. तो म्हणाला, “ग्रॅव्हिटी या चित्रपटाचा आवाका खूप मोठ होता. आर्थिक अडचणींमुळे दोन वेळा चित्रपटाचं शूटिंग थांबलं होतं. शेवटी चित्रपटातील काही कलाकारांनी मिळून आर्थिक हातभार लावावा असा आम्ही निर्णय घेतला. मी देखील कर्ज वगैरे काढून १४ मिलियन डॉलर्स दिले होते. अन् अपेक्षेप्रमाणे हा चित्रपट सुपरहिट ठरला. आम्हाला सर्वांना एकूण गुंतवणूकीच्या तिप्पट पैसे परत मिळाले. त्यावेळी मी इतका आनंदी होतो की माझ्या १४ मित्रांमध्ये मी १४ मिलियन रोख वाटले. या मित्रांनी करिअरच्या सुरुवातीस मला खूप मदत केली होती. त्यांचे आभार मानण्यासाठी हे पैसे त्यांना मी दिले.”

अवश्य वाचा – सोज्वळ सुनेचा ग्लॅमरस अवतार; अभिनेत्रीच्या हॉट फोटोशूटमुळे चाहते आवाक्

जॉर्जने ग्रॅव्हिटीमध्ये मॅट ही मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. तो चित्रपटात अंतराळवीराच्या भूमिकेत झळकला होता. नामांकित स्टारकास्ट, अफलातून पटकथा, अवाक् करणारी दृष्य आणि आश्चर्यचकित करणारे बजेट या मुळे हा चित्रपट तुफान चर्चेत होता. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी त्यावेळी जवळपास ७०० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. या चित्रपटाच्या निम्म्या खर्चात भारतानं मंगळयान तयार केलं होतं. अर्थात या तुलनेमुळे भारतातही ग्रॅव्हिटीबाबत जोरदार चर्चा होती.