दीपिका पादुकोन आणि रणवीर सिंग याचा विवाहसोहळा इटलीत संपन्न होत आहे. या सोहळ्याचे फोटो पाहण्यास चाहते उत्सुक आहेत. अगदी चातकाप्रमाणे चाहते दोघांच्याही फोटोंची प्रतीक्षा करत आहेत. मात्र लग्न होऊन १२ तासांचा अवधी उलटला तरीही चाहत्यांना अजूनही फोटोंची झलकही पाहायला मिळाली नाही. अनेकांच्या नजरा या दोघांच्याही सोशल मीडिया अकाऊंटवर लागून आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवविवाहित जोडप्याला पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. ही उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मात्र लवकरच चाहत्यांची प्रतिक्षा संपणार कारण सिंधी पद्धतीनं विवाह पार पडल्यानंतर या दोघांचेही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात येणार आहेत. प्रसिद्ध छायाचित्रकार विशाल पंजाबी रणवीर दीपिकाच्या आयुष्यातील खास क्षण टिपणार आहे.

संध्याकाळच्या सुमारास लग्नाच्या साऱ्या विधी आटोपल्यानंतर हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात येणार असल्याचं दीप-वीरच्या जवळच्या व्यक्तीनं सांगितलं. त्यामुळे या नवविवाहित दाम्पत्याला पाहण्यासाठी चाहत्यांना आणखी काही तास प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heres when deepika padukone ranveer singh wedding photo will come out
First published on: 15-11-2018 at 12:30 IST