घटस्फोटानंतर हृतिक-सुझान पुन्हा करणार लग्न?

हृतिक-सुझानने २०१६मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.

हृतिक रोशन, सुझान खान

एकेकाळी हृतिक रोशन आणि सुझान खान हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडप्यांमध्ये गणले जायचे. अनेकांना ‘कपल गोल्स’ देणाऱ्या या जोडप्याने २०१६मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. पण, त्यांच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

VIDEO : सई-शरदच्या रहस्यमय ‘राक्षस’चा टीजर

एका प्रसिद्ध वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, हृतिक पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडकण्याची शक्यता आहे. घटस्फोटानंतर हृतिक आणि सुझान कदाचित पुन्हा लग्न करणार असल्याचे म्हटले जातेय. हृतिक आणि सुझानला आता पुन्हा नव्याने आयुष्याची सुरुवात करण्याची इच्छा आहे. त्यांनी आपल्या नात्याला आणखी एक संधी देण्याचा विचार केला असून, त्यादिशेने त्यांनी तसे पाऊलही उचलले आहे. तसेच, त्यांच्या मुलांच्या योग्य संगोपनासाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे त्यांना वाटते, असे हृतिकच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले. मात्र, रोशन कुटुंबातील एका व्यक्तीने हे वृत्त फेटाळून लावले.

VIDEO : कपिलच्या जंजीर कुत्र्याचा मृत्यू

घटस्फोटानंतरही हे दोघे अनेकदा एकत्र दिसले. हृतिक-सुझानचा एकमेकांसोबतचा वावर पाहता हे दोघं विभक्त झाल्याचे कोणालाच त्यांच्याकडे बघून वाटले नसेल. सुझान नेहमीच हृतिकच्या पाठीशी उभी राहिली. कंगनासोबतच्या वादातही तिने आपल्या पूर्वाश्रमीच्या पतीची साथ सोडली नाही. नुकताच हृतिकने सुझान आणि त्यांच्या जवळच्या मित्रपरिवारासह आपला ४४वा वाढदिवस साजरा केला. सुझाननेही हृदयस्पर्शी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Hrithik roshan to marry ex wife sussanne khan again