बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी आणि राकेश बापट सध्या सोशल मीडियावर सातत्यानं चर्चेत आहेत. या दोघांची ओळख बिग बॉस ओटीटी दरम्यान झाली होती. त्यानंतर शमिता- राकेशमध्ये जवळीक वाढत गेली आणि बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर या दोघांनीही त्यांच्या नात्याची कबुली दिली. आता हे दोघं लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा आहे. शमितानं व्हॅलेंटाइन डेला शेअर केलेल्या पोस्टमुळे सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

राकेश आणि शमिता यांच्यात नेहमीच क्यूट बॉन्डिग पाहायला मिळतं. अशात व्हॅलेंटनइन डेच्या निमित्तानं राकेशनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेला फोटो शमितानं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या पोस्टमध्ये एक फोटो शेअर केला आहे आणि त्यात शमितानं राकेशचा हात पकडलेला दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘चांगल्या हातात.’ ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे आणि त्यामुळेच या दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Digital Health Incentive Scheme
यूपीएससी सूत्र : स्मार्ट सिटी मिशनची मुदतवाढ अन् ‘डिजिटल हेल्थ इन्सेटिव्ह स्कीम’, वाचा सविस्तर…
Ghatkopar hoardings
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट; होर्डिंगला परवानगी देणाऱ्या IPS अधिकाऱ्याच्या पत्नीचं कनेक्शन? अनोळखी खात्यातून व्यवहार
SEBI Recruitment 2024
SEBI Recruitment 2024 : सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियामध्ये होणार नोकरीची भरती!
Hyundai Motor India Grand IPO soon
ह्युंदाई मोटर इंडियाचा लवकरच ‘महा-आयपीओ’
helmet clad chain snatcher targets unsuspecting woman eating pizza with friend in haryanaa panipat shocking video viral
तो आला, त्याने पाहिले अन् सोन्याची चेन चोरून झाला पसार; हॉटेलमध्ये प्रथमच झाली अशी चोरी; घटनेचा VIDEO व्हायरल
yokogawa acquire adept fluidyne
पुणेस्थित ॲडेप्ट फ्ल्युडाईनचे योकोगावाकडून संपादन
Rohit Sharma wife Ritika Sajdeh Trolled Social media
रितिका सजदेहसह रोहित शर्माही सोशल मीडियावर होतोय ट्रोल, चाहत्यांचा रोष पाहून रोहितच्या पत्नीने…
eco friendly engineering consultancy ztech india ipo to launch on may 29
पर्यावरण-स्नेही अभियांत्रिकी सल्लागार ‘झेड टेक’चा बुधवारपासून ‘आयपीओ’

दरम्यान राकेश आणि शमितानं मात्र लग्नाचा कोणताही प्लान अद्याप शेअर केलेला नाही. शमितानं व्हॅलेंटाइन डेला तिच्या इनस्टाग्रामवर एक व्हिडीओ देखील शेअर केला होता. ज्यात ती आणि राकेश व्हाइट कलरच्या आउटफिट्समध्ये परफेक्ट दिसत होते. हा व्हिडीओ शेअर करताना तिने राकेशसाठी खास पोस्टही लिहिली होती.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर शमिता शेट्टी जास्तीत जास्त वेळ राकेश बापटसोबत व्यतित करताना दिसत आहे. दोघांनाही सातत्यानं मुंबईमध्ये एकत्र स्पॉट केलं जात आहे. अलिकडेच ‘इ-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत शमितानं तिचं रिलेशनशिप स्टेटस आणि लग्नाच्या प्लानिंगवर भाष्य केलं होतं. शमितानं या मुलाखतीत लग्न करून आयुष्यात सेटल होण्याची तसेच आई होण्याची इच्छा व्यक्त केली होती.