scorecardresearch

Premium

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना करतायत एकमेकांना डेट? सोशल मीडियावर फोटोंची चर्चा

रश्मिका मंदनाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून यावरून ती विजय देवरकोंडाला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

rashmika mandanna, vijay devarakonda, rashmika mandanna boyfriend, vijay devarakonda relationship, रश्मिका मंदाना, विजय देवरकोंडा, रश्मिका मंदाना ट्वीट, रश्मिका मंदाना बॉयफ्रेंड
विजय देवरकोंडा आणि रश्मिका एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा मागच्या काही काळापासून सुरू आहेत.

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना मागच्या काही काळापासून सातत्यानं सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला तिचा ‘पुष्पा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. या चित्रपटातील रश्मिकाच्या कामाचं बरंच कौतुक झालं. पण आता रश्मिका सोशल मीडियावर चर्चेत आली आहे ती तिच्या खासगी आयुष्यामुळे. रश्मिका मंदानानं तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे ती सध्या अभिनेता विजय देवरकोंडा याला डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे.

विजय देवरकोंडा आणि रश्मिका एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा मागच्या काही काळापासून सुरू आहेत. पण आता सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत. ज्यावरून हे दोघंही गोव्यात एकत्र सुट्ट्या एन्जॉय करत असल्याचं बोललं जात आहे.

Angry husband danced in such a way that his wife would never forget for rest of her life
VIDEO: जबरदस्ती नाच म्हणाल्यामुळे नवरदेवाला आला राग, रागावलेल्या नवऱ्यानं केलं असं काही की…नेमकं काय घडलं?
dog balancing glass on his head viral video
Video : तोंडात लाकडी फळी त्यावर दोन ग्लास अन् एक डोक्यावर; श्वानाचे हे अफलातून कौशल्य पाहा
MS Dhoni participating in a friend's engagement Video has gone viral
MS Dhoni : मित्राच्या साखरपुड्यात विधी समजावून सांगताना दिसला माही, VIDEO होतोय व्हायरल
Chhagan Bhujbal
“छगन भुजबळ भाजपाच्या वाटेवर?” ‘या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण, कुणी उपस्थित केलाय हा प्रश्न?

नवीन वर्षाच्या सुरुवातीला रश्मिकानं सोशल मीडियावर चाहत्यांना शुभेच्छा देत स्वतःचा एक फोटो शेअर केला होता. स्विमिंग पुलच्या बाजूला उभ्या असलेल्या रश्मिकाचा हा फोटो त्यावेळी चर्चेत आला जेव्हा विजय देवरकोंडाचा भाऊ आनंदनं त्याच बॅकग्राउंड आणि लोकेशनचा फोटो शेअर केला. या दोघांचे फोटो समोर आल्यानंतर या रश्मिका आणि विजय यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं आहे.

रश्मिका आणि विजय यांची जोडी चित्रपटातच नाही तर सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. या दोघांनी ‘गीता गोविंदम’ आणि ‘डियर कॉम्रेड’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. त्यानंतर या दोघांच्या अफेअरच्या चर्चा होऊ लागल्या होत्या. मात्र हे दोघंही नेहमीच आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत असं सांगताना दिसतात.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Is rashmika mandanna dating vijay devarakonda photo goes viral on social media mrj

First published on: 03-01-2022 at 20:11 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×