सध्या झी मराठी वाहिनीवरील चर्चेत असणारी मालिका म्हणजे ‘माझ्या नवऱ्याची बायको.’ या मालिकेतील शनाया आणि गॅरीची जोडी जितकी चर्चेत असते तितकीच राधिका आणि सौमित्रची मैत्री रसिकांना पाहायला आवडते. आज शनाया उर्फ ईशा केसकरचा वाढदिवस आहे. ईशाचा जन्म ११ नोव्हेंबर १९९१ मध्ये पुण्यात झाला. २०१३ मध्ये ईशाने ‘वि आर ऑन, होऊन जाऊ द्या’ चित्रपटातून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. मात्र ‘जय मल्हार’ मालिकेतील बानू या भूमिकेमुळे ईशा घराघरात पोहोचली. सध्या ईशा ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत शनायाची भूमिका साकारत आहे. सध्या तिच्या या भूमिकेचे कौतुक केले जात आहे.
ईशा केसकर बऱ्याच वेळा आपल्या चाहत्यांची संवाद साधत असते. काही दिवसांपूर्वी ईशाने तिला आवडत असलेल्या गोष्टींचा आणि तिच्या नात्याचा खुलासा केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून ईशा ‘काहे दिया परदेस’ मालिकेतील अभिनेता ऋषी सक्सेनाला डेट करत आहे. ईशा आणि ऋषीची पहिली भेट ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर झाल्याचे तिने सांगितले होते. त्यानंतर त्यांच्या नात्याला सुरुवात झाली असल्याचे म्हटले जाते. ऋषी आणि ईशाच्या नात्याला २९ जुलै रोजी दोन वर्ष पूर्ण झाल्याचे देखील ईशाने सांगितले. सध्या ईशा आणि ऋषी मराठी चित्रपटसृष्टीमधील सर्वांचे आवडते कपल असल्याचे देखील म्हटले जाते.
ईशा ही सतत मस्तीखोर स्वभावामुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करते. ती सतत सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी एका चाहत्याने लग्न कधी करणार हा प्रश्न ईशाला विचारताच ‘लवकर नाही’ असे उत्तर दिले होते. दरम्यान ईशाला तिची आवडती स्विट डिश कोणती असा प्रश्न देखील विचारण्यात आला होता. त्यावर ईशाने ऋषी सक्सेनाचा फोटो पोस्ट करत ‘हा आणि सगळं स्वीट’ असा रिप्लाय दिला आहे. ईशाच्या या संवादामुळे चाहते आनंदी झाले होते.
View this post on InstagramThis quiz is AI-generated and for edutainment purposes only.
सध्या ईशा ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत शनायाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. तसेच उपेंद्र सिधये यांच्या ‘गर्लफेंड’ या चित्रपटात देखील दिसली होती. चित्रपटातील तिची भूमिका चाहत्यांना चांगलीच पसंतीला उतरली होती.