‘मला कधीच वडिलांचं प्रेम मिळालं नाही’; कुमार सानूच्या मुलाने व्यक्त केली खंत

‘माझी आई गरोदर असताना…’; जान सानू झाला भावूक

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू सध्या बिग बॉस १४ मध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. या शोच्या माध्यमातून जान त्याची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. अलिकडेच त्याने बिग बॉसच्या घरातील सदस्यांना त्याच्या पर्सनल लाइफविषयी काही गोष्टी सांगितल्या. यामध्ये मला कधीच माझ्या वडिलांचं प्रेम मिळालं नाही, असंही तो म्हणाला.

मला कधीच माझ्या वडिलांचं प्रेम मिळालं नाही. माझी आई ६ महिन्यांची गरोदर असतानाच ते तिला सोडून गेले. त्यामुळे मला कधीच वडिलांचं प्रेम मिळालं नाही. माझा सगळा सांभाळ माझ्या आईनेच केला असं जानने बिग बॉसच्या घरात सांगितलं.

 

View this post on Instagram

 

Inteha ho gayi , intezaar ki!#JKS #JaanKumarSanu

A post shared by Jaan Kumar Sanu (@jaan.kumar.sanu) on

दरम्यान, कुमार सानू यांनी रिटाला ( जानची आई) घटस्फोट दिल्यानंतर त्यांनी सलोनी साहूसोबत लग्न केलं. सध्या जान बिग बॉसच्या घरात आल्यामुळे त्याची आई एकटी पडली आहे. म्हणूनच त्याला सतत आईची काळजी वाटत आहे. बिग बॉसच्या घरात आल्यानंतर जान त्याच्या स्वभावामुळे चर्चेत येत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Jaan kumar sanu reveals father divorced her 6 month pregnant mother when he was inside womb ssj

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या