गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस चर्चेत आहे. या चर्चा जॅकलिनचा २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखरसोबतचा फोटो व्हायरल झाल्यामुळे सुरु झाल्या. या फोटोवरुन जॅकलिन सुकेशला डेट करत असल्याचे म्हटले जात होते. अशातच जॅकलिनचा सुकेशसोबतचा आणखी एक रोमँटिक फोटो व्हायरल झाला आहे.

स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, जॅकलिन आणि सुकेशचा हा फोटो एप्रिल-जूनमधील आहे. त्याच वेळी तो जामिनावर तिहार जेलमधून बाहेर आला होता. एकंदरीत हा फोटो पाहता जॅकलिन आणि सुकेश यांच्यामध्ये चांगले नाते असल्याचे स्पष्ट होत आहे. पण जॅकलिनने त्यांच्यामध्ये कोणतेही नाते नसल्याचे सांगितले होते.
आणखी वाचा : ‘त्या घटनेनंतर मला पॅनिक अटॅक येऊ लागले’, ‘कबीर सिंग’मधील अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

फोटोमध्ये सुकेशच्या हातात फोन दिसत आहे. या फोनमध्येच इस्रायलचे सीम कार्ड टाकून २०० कोटी वसूल केले होते. सुकेशला जामीन मंजुर झालानंतरही तो हा फोन वापरत होता. पण या फोटोमध्ये जॅकलिन असल्यामुळे सध्या चर्चेत आहे.

काही दिवसांपूर्वी २०० कोटी रुपयांच्या मनी लॉऩ्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून जॅकलिनची जवळपास ८ तास चौकशी झाली होती. २३ ऑक्टोबर रोजी सुकेश चंद्रशेखरचे वकील यांनी खुलासा केला होता की जॅकलीन तुरुंगात असलेल्या सुकेशसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण जॅकलिनने हे खोटे असल्याचे म्हटले होते. “जॅकलिन फर्नांडिसला ईडीने साक्षीदार म्हणून बोलावले आहे. तिने तिचे जबाब नोंदवले असून, ती या पुढेदेखील तपासकार्याला पूर्णपणे सहकार्य करेल,” असे जॅकलिनच्या वकिलाने म्हटले होते. २०० कोटींच्या खंडणीप्रकरणात ‘मद्रास कॅफे’ फेम अभिनेत्री लीना मारिया पॉललाही अटक करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘तिहार कारागृहातून २०० कोटी रुपये वसूल करणारा सुकेश चंद्रशेखर स्वत:ची खरी ओळख न सांगता जॅकलिनला फोन करत असे. तो स्पूफिंगद्वारे तिहार जेलमधून जॅकलिनला फोन करत असल्याचे म्हटले जात आहे. त्याने जॅकलिनला काही महागाड्या भेटवस्तू देखील गिफ्ट म्हणून पाठवल्या होत्या. पण चौकशीदरम्यान जॅकलिनने तिला भेटवस्तू पाठवणारी आणि फोन करणारी व्यक्ती जेलमध्ये असल्याची तिला कल्पना देखील नव्हती’, असे जॅकलिन म्हणाली होती.