Video: बॉलिवूड अभिनेत्रीने रस्त्यावर चालवली चक्क ई-रिक्षा

सध्या तिचा हा व्हिडीओ चर्चेत आहे.

सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती अभिनेत्री चक्क रस्त्यावर ई-रिक्षा चालवताना दिसत आहे. कोण आहे ती अभिनेत्री? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी जान्हवी कपूर आहे.

सध्या जान्हवी तिचा आगामी चित्रपट ‘गुड लक जेरी’च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या सेटवरील अनेक मजेशीर फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यामधील जान्हवीचा ई-रिक्षा चालवतानाच्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

जान्हवी कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यामधील एक व्हिडीओमध्ये जान्हवी ई-रिक्षा चालवताना दिसत आहे. तिच्या सोबत या रिक्षामध्ये आणखी काही व्यक्ती बसल्याचे दिसत आहे. जान्हवीचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने ‘चित्रपटांचे चित्रीकरण करणे मजेशीर असते’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

‘गूड लक जेरी’ या चित्रपटात जान्हवी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिच्यासोबत अभिनेता दीपक डोब्रियाल, मीता वशिष्ठ, नीरज सूद हे कलाकार दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ सेन गुप्ता करत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Janhvi kapoor drives an electric rickshaw on the sets video viral avb