scorecardresearch

Premium

Video: काजोल आणि बहिण तनिषामध्ये भर मंडपात जुंपली, आईने केली मध्यस्थी

व्हिडीओमध्ये काजोल तनिषाला ‘शांत बस’ असे बोलताना दिसत आहे.

kajol, kajol fight, kajol video, sister tanisha mukharji, tanisha mukharji, tanisha mukharji video,

बॉलिवूड अभिनेत्री काजोल ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे तर कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे. सध्या सोशल मीडियावर काजोलचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती बहिण तनिषा मुखर्जीशी भांडताना दिसत आहे. नेमकं काजोल आणि तनिषामध्ये कशावरुन भांडण झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा काजोलचा व्हिडीओ हा दुर्गा पूजेच्या वेळचा आहे. काजोलने निळ्या रंगाची साडी नेसली आहे तर तनिषाने पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे. दोघीही या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. दरम्यान, भर मंडपात काजोल आणि तनिषा यांच्यामध्ये वाद झाल्याचे दिसत आहे. काजोल तनिषाला ‘शांत बस’ असे बोलताना दिसत आहे.
आणखी वाचा: ९ वर्षांच्या चिमुकलीने केली ‘दयाबेन’ची नक्कल, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Health Special, winter, eat bitter
Health Special : हिवाळा संपता संपता कडू का खावं?
Man finds worm crawling in orange he bought from Zepto Company issues refund
Zeptoवरून मागवलेल्या संत्र्यामध्ये व्यक्तीला सापडली जिवंत अळी! पाहा, कपंनीने मागितली माफी
a street vendor boy made Maggi with coffee and milk
‘कॉफीवाली मॅगी!’ तरुणाने चक्क कॉफीमध्ये शिजवली मॅगी, मॅगीच्या विचित्र रेसिपीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
Delhi Salon firing shot dead २
दिल्लीतल्या सलूनमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार, दोघांची हत्या, CCTV VIDEO व्हायरल

तसेच काजोलची आई तुनजा या दोघींना शांत करताना दिसत आहे. तनुजा या काजोल आणि तनिषाला समजावताना दिसतात. त्यानंतर त्या तिघीही एकत्र फोटो काढतात. काही दिवसांपूर्वी तनुजा, काजोल आणि तनिषा यांचे दुर्गा पूजेमधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता सध्या त्यांचा हा भांडणाचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kajol and sister tanisha mukharji fight avb

First published on: 21-10-2021 at 11:17 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×