बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान उर्फ केआरके आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर तो रोखठोकपणे आली मतं मांडतो. परिणामी अनेकदा त्याला ट्रोल देखील केलं जातं. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. कमाल खान आत्महत्या करणार आहे अशी चर्चा गेले काही दिवस सोशल मीडियावर रंगली होती. या चर्चेवर अखेर केआरकेने प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवश्य पाहा – VJ ते प्रसिद्ध अभिनेत्री; ७ वर्षात यशाच्या शिखरावर पोहोचणाऱ्या चित्राची आत्महत्या

“मी १०० टक्के तंदुरुस्त आहे. मी आर्थिक संकटात किंवा नैराश्येमध्ये नाही. काही टीकाकार मला त्रास देण्यासाठी मी आत्महत्या करणार असल्याच्या अफवा पसरवत आहेत. कृपया त्यांच्याकडे दुर्लक्ष करा मी आत्महत्या करणार नाही.” अशा आशयाचं ट्विट करुन केआरकेने अफवांवर प्रत्युत्तर दिलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – Forbes List 2020: सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत बॉलिवूडचाच दबदबा

अवश्य पाहा – करोना आणि क्षयरोग यांच्यात काय फरक आहे?

यापूर्वी त्याने ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय कुमारवर निशाणा साधला होता. “देवी लक्ष्मी धन आणि सौभाग्यचं प्रतिक आहे. अक्षय कुमारने देवी लक्ष्मीचा अपमान केला आहे. त्यामुळे त्याला धडा शिकवण्यासाठी प्रेक्षकांनी ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटावर बहिष्कार टाकावा. म्हणावं हा कॅनडा नाही भारत देश आहे. इथे देवी-देवतांची पुजा केली जाते. त्यांची चेष्ठा करत नाही.” अशा आशयाचं ट्विट करुन त्याने ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kamaal r khan about committing suicide mppg
First published on: 10-12-2020 at 17:25 IST