बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडमधील घराणेशाही ते देशातील राजकारण अशा विविध विषयांवर ती रोखठोकपणे आपली मतं मांडते. काही दिवसांपूर्वी शेतकरी आंदोलनावरून केलेल्या वक्तव्यांमुळे कंगना चर्चेत आली होती. आता तिने एक व्हिडीओ शेअर करत सोनम कपूर, करण जोहर, शिवसेना, बॉलिवूड, सलोनी गौर आणि तापसी पन्नू यांच्यावर निशाणा साधला आहे. कंगनाने हा व्हिडीओ शेअर करत अप्रत्यक्षरित्या त्यांच्यावर टीका केली आहे. कंगनाने एक व्हिडीओ रिट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये सोनम, करण आणि तापसी पन्नू यांची खिल्ली उडवली आहे. हा व्हिडीओ रिट्वीट करत कंगना म्हणाली, "हाहाहा." कंगनाचे हे ट्वीट प्रचंड व्हायरल झाले आहे. यात कंगनाचे चाहते तिची साथ देत आहेत, तर दुसरीकडे अनेक लोक तिला ट्रोलदेखील करत आहेत. Ha ha ha — Kangana Ranaut (@KanganaTeam) December 29, 2020 दरम्यान, कंगना लवकरच 'थलाइवी' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारत आहे. याशिवाय तिचा ‘तेजस’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.