कधी मित्र तर कधी शत्रू, असेच काहीसे आहेत टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध कॉमेडियन्स कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर. या दोघांमधील वाद आतापर्यंत सर्वांनाच कळला आहे. ‘द कपिल शर्मा शो’ मधून बाहेर पडलेल्या सुनीलची आजही प्रेक्षक आठवण काढतात. त्याने पुन्हा या शोमध्ये यावे अशी त्याच्या अनेक चाहत्यांची इच्छा आहे. आपल्या विनोदांनी सर्वांना खळखळून हसविणाऱ्या या सर्वांच्या लाडक्या कॉमेडियनचा आज म्हणजेच सुनील ग्रोवरचा आज वाढदिवस आहे.
सुनील आज ३९ वा वाढदिवस साजरा करतोय. आजच्या घडीला भलेही सुनील कपिलच्या शोचा हिस्सा नसला तरी कपिल त्याला आजही त्याचा चांगला मित्र समजतो. सुनीलच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कपिलने त्याला ट्विटरवर शुभेच्छा दिल्या. तुला जगातील सर्व सुख मिळो अशा शब्दात त्याने शुभेच्छा दिल्या. अभिनेता शाहरुख खाने यानेही कपिलच्या ट्विटर कमेंट देत सुनीलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, सुनीलने त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
वाचा : स्मिता पाटीलच्या मुलाने दिली ड्रग्स घेत असल्याची कबुली
Wish u a very happy birthday @WhoSunilGrover paji … may god bless u with all the happiness of this world. Lots of love always 🙂
— Kapil Sharma (@KapilSharmaK9) August 3, 2017
सुनील आणि कपिल या दोघांनीही सोशल मीडिया आणि मुलाखतींमध्ये एकमेकांना माफ केल्याचे म्हटले असले तरी या दोघांमधील दुरावा स्पष्ट दिसून येतो. विमान प्रवासात या दोघांमध्ये झालेल्या भांडणानंतर ते कधीच एकत्र दिसले नाहीत. पण, ‘द कपिल शर्मा शो’मध्ये कपिल अधून मधून सुनीलसोबतची त्याची मैत्री आणि भांडणाबद्दल बोलतो. यातून कपिलला आजही सुनीलची कमतरता जाणवत असल्याचे दिसून येते.
सुनील ग्रोवरने चंदीगड येथील थिएटरमधून मास्टर डिग्री घेतली होती. त्याचवेळी प्रसिद्ध कॉमेडियन जसपाल भट्टी यांनी त्याच्यातील कलागुणांना ओळखले. १९९८ साली आलेल्या ‘प्यार तो होना ही था’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा सुनील आज कॉमेडी शोजचा किंग आहे. खूप कमी जणांना माहित असेल की, याआधी सुनील रेडिओ जॉकी म्हणून देखील काम करत होता.
वाचा : ‘पतीने दिलेल्या पोटगीवर मजा मार’ कमेंटवर मलायकाचे सडेतोड उत्तर