बॉलिवूडमध्ये सर्वांत जास्त चर्चेत असलेली जोडी म्हणजे रणबीर कपूर आणि कतरिना कैफ. दोघांमध्ये ब्रेक अप जरी झाला असला तरी आता ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दोघेही एकत्र आगामी ‘जग्गा जासूस’ या सिनेमाचे प्रमोशन करतानाही दिसणार आहेत.

कतरिनाने नुकताच एक व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय आणि हा व्हिडिओ पाहून अजूनही तिचं रणबीरवर प्रेम आहे का असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडेल. या व्हिडिओमध्ये रणबीर आपल्या चाहत्यांना ‘आय लव्ह यू’ आणि फ्लाईंग किसेस देताना दिसतोय. तर व्हिडिओअखेर कतरिना गंमतशीरपणे रणबीरच्या कानाखाली मारते.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर दोघांमध्ये सध्या फक्त मैत्री आहे की मैत्रीपेक्षा अधिक कोणतं नातं आहे, या प्रश्नांनी चाहते नक्कीच गोंधळून गेले असतील. याचं नेमकं उत्तर तर स्वत: रणबीर आणि कतरिनाच देऊ शकतील. मात्र दोघांचा हा गंमतशीर व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांचं खूप मनोरंजन करताना दिसतोय.

वाचा : रजनीकांत आणि अक्षय कुमारच्या ‘२.०’ ची प्रदर्शनापूर्वीच कोट्यवधींची कमाई

कतरिना रणबीरसोबत मिळून ‘जग्गा जासूस’चे प्रमोशन करणार नसल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी होती. मात्र आता तिने सर्व गोष्टी बाजूला सारत चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसत आहे. प्रमोशनसाठी दोघेही एकत्र मुलाखती आणि अनेक शहरांची भ्रमंतीसुद्धा करणार आहेत. त्यामुळे रणबीर आणि कतरिनाच्या चाहत्यांसाठी ही एक चांगली बातमी ठरणार आहे.