मराठी नाट्यप्रेमींच्या मनावर आपली छाप पाडणाऱ्या ‘सही रे सही’ नाटकाने १५ ऑगस्टला १८ वर्षे पूर्ण केली. ‘सही रे सही’ हे नाटक आजवरच्या मराठी नाटकांमधल्या सर्वात यशस्वी नाटकांपैकी एक आहे. या नाटकाच्या आठवणींना उजाळा देत केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर भरतसाठी एक विशेष पोस्ट लिहिली आहे.

केदार शिंदेंची पोस्ट-

kiran mane shares post about propaganda films
“छुपा मुस्लीमद्वेष परसवणाऱ्या प्रोपोगंडा चित्रपटांमध्ये…”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत, घेतला महत्त्वाचा निर्णय
documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..

१८ वर्ष आज पूर्ण होतायत. १५.०८.२००२ रोजी हा “सही” रथ ज्या भरधावाने निघाला तो अजूनही त्याच वेगात आहे. मला अजूनही आठवतो तो दिवस. माझ्या टाटा इंडिका गाडीतून मी आणि भरत, शिवाजी मंदिरच्या दिशेने निघालो… तेव्हा एकच गोष्ट मी भरतला वारंवार सांगत होतो. “भरत आज दिवस तुझा आहे. जे जे आजपर्यंत करावसं वाटत होतं, ते साकार करण्याचा आजचा दिवस आहे. मी पडदा उघडल्यावर पडद्यामागे असणार. रंगमंच तुझा असणार आहे. त्यामुळे बागड त्या रंगमंचावर! आपल्या आण्णांनीच तो रंगमंच बांधलाय असं समज!” आणि…. भरत जाधव याने परत परत परत परत तेच केलं. तब्बल १८ वर्ष.

या संपुर्ण प्रवासात त्याच्या सोबत त्याच तडफेने काम करणारे कलाकार आणि पडद्यामागचे तंत्रज्ञ… त्यांचं प्रेम अजूनही या जादूई नाटकावर तेवढच आहे आणि तेवढच राहील.

मी मुलीच्या बापाच्या भूमिकेत होतो आणि राहीन! आपण लाडाने प्रेमाने मुलीला वाढवायचं आणि योग्य वेळी तीचं लग्न लावल्यावर तीचा सुखाचा संसार पाहायचा! या दरम्यान मुलीला काही अडचण,त्रास झाला तर वेळोवेळी तत्परतेने पाठीशी उभंही राहायचं. माझ्या या मुलीचं लग्न भरत जाधव या कर्तव्यतत्पर मुलाशी लावलं. या दरम्यान “सासवा” बदलल्या. मुलीला आणि भरतलाही त्याचा त्रास झाला. पण नेटाने त्याने संसार केला. आणि आता तर त्याने स्वत:चा संसार थाटलाय. खुप समाधान वाटतं!!!!

हे नाटक कधी बंद होऊ नये.. पण जेव्हा हे थांबेल त्याला कारणीभूत भरतच असेल. तो जोवर तडफेने काम करतोय तोवर हे नाटक सुरू राहील. त्याला कंटाळा येईल तेव्हा हे थांबेल! पण मला वाटत नाही की , अजून १८ वर्षाने ही वेळ येईल!

कोरोनाच्या पार्श्वभुमिवर नाटक थांबलय. त्यामुळे खुप नुकसान कलाकार, तंत्रज्ञांचं होतय!!! पण त्याही पेक्षा अधिक नुकसान रसिक प्रेक्षकांचं होतय. त्यांचं दिलखुलासपणे हसणं थांबलयं. पण काळजी नको. कोरोनापें रोने के बाद, त्यावर जालिम इलाज फक्त एकच असणार आहे….. “सही”

श्री स्वामी समर्थांच्या कृपेने अशी कलाकृती माझ्या हातून घडली. पण यात माझ्या पाठीमागे असणारे स्वामी होतेच, पण त्या सोबत अजून एक व्यक्ती होती, माझा मित्र अंकुश चौधरी.. मी,भरत,अंकुश या तिघांच्या मैत्रीचं प्रतिबिंब म्हणजे… “सही”

भरत जाधवने ‘सही’चा रथ कसा पुढे नेला आणि त्यात अंकुश चौधरीची मोलाची साथ कशी मिळाली हे केदार शिंदेंनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं. करोनाच्या प्रादुर्भावामुळे नाट्यगृहे बंद आहेत. परिस्थिती सुधारल्यावर पुन्हा एकदा या नाटकाचे प्रयोग सुरू व्हावेत आणि प्रेक्षकांनी पुन्हा खळखळून हसावेत अशी आशा केदार शिंदे यांनी या पोस्टच्या अखेरीस व्यक्त केली.