‘कॉफी विथ करण ७’च्या नव्या भागामध्ये किंग खान शाहरुखची पत्नी गौरी खान, चंकी पांडेची पत्नी भावना पांडे तसेच संजय कपूरची पत्नी महीप कपूर यांनी हजेरी लावली होती. यावेळी या तिन्ही सेलिब्रिटी पत्नींना करण जोहरने त्यांच्या खासगी आयुष्याबाबत प्रश्न विचारले. यावेळी शाहरुख तसेच मुलांबाबत गौरीलाही करणने बोलण्यास भाग पाडलं. यादरम्यान तिने आपला मुलगा आर्यन खानला एक विचित्र सल्ला दिला आहे.

‘कॉफी विथ करण ७’ शोमध्ये रॅपिड फायर हा एक राऊंड असतो. यावेळी करण शोमध्ये उपस्थित असलेल्या व्यक्तींना त्यांच्या खासगी आयुष्याबाबत प्रश्न विचारतो. गौरीला रॅपिड फायरदरम्यान करण विचारतो, आर्यन खानला डेटिंगबाबत काय सल्ला देशील? या प्रश्नावर गौरीने क्षणाचाही विलंब न लावता अगदी विचित्र उत्तर दिलं.

काय म्हणाली गौरी खान?
“जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत तुला पाहिजे तितक्या मुलींना तू डेट कर. पण लग्नानंतर मात्र या सगळ्या गोष्टी थांबव.” म्हणजेच आपल्या लेकाला तिने रिलेशनशिपबाबत स्वतंत्र्य निर्णय घेण्याचा सल्ला दिल्ला आहे. त्याचबरोबरीने डेटिंगबाबत लेक सुहाना खानला काय सल्ला देशील असंही गौरीला विचारण्यात आलं. यावर ती म्हणाली, “एकाचवेळी दोन मुलांना डेट करू नको.”

आणखी वाचा – “लोक मला काम देत नाहीत कारण…” शाहरुख खानच्या पत्नीने व्यक्त केली खंत, पतीच्या नावाचाही केला उल्लेख

गौरी आपल्या मुलांना रिलेशनशिपबाबत विचित्र सल्ले देताना दिसली. तसेच यावेळी तिने इंटिरियर डिझायनर म्हणून काम मिळत नसल्याची खंतही व्यक्त केली. शाहरुख खानची पत्नी म्हणून आपल्याला कोणीच काम देत नसल्याचं गौरीने यावेळी स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं.