“छत्रपती शिवरायांच्या सेवेचा वारसा घेत अनेक क्रांतीकारकांना घडवणारे आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे हे भारतीय स्वातंत्र्याचे आणि क्रांतीचे उद्गाते आहेत. त्यांच्यावर इतिहासाने अन्याय केला आहे. महात्मा फुले, वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक यांच्यासह इतर अनेक महापुरुषांना घडवणाऱ्या लहुजी साळवे यांच्या चित्रपटासाठी प्रत्येकाने लोकवर्गणी द्यायला हवी. त्यांचे कार्य समजून घेऊन समाजापर्यंत आपला इतिहास पोहोचवला पाहिजे,” असे प्रतिपादन मराठवाडा विद्यापीठाचे समन्वयक आणि शिक्षणतज्ज्ञ प्रा. शिवाजी दळणर यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आलवसा फाउंडेशन व ऐसपैस निर्मिती यांच्या वतीने आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला त्यांच्या जीवनावरील चित्रपटाच्या टीजर व पोस्टरचे लोकार्पण रविवारी झाले. गंज पेठेतील सावित्रीबाई फुले सभागृहात रंगलेल्या या सोहळ्यात महाराष्ट्र शाहीर परिषदेचे अध्यक्ष दादा पासलकर, मध्यप्रदेशातील राज्यमंत्री कृष्णचंद्र ठाकुर (सीसोदिया), नऱ्हे येथील जाधवर शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. सुधाकरराव जाधवर, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, अभिनेते गिरीश परदेशी, नगरसेविका स्वाती लोखंडे, लहुजी वस्ताद स्मारकाचे अशोक लोखंडे, आलवसा फाउंडेशनचे अध्यक्ष शंकर भडकवाड व ऐसपैस निर्मितीचे क्रिएटिव्ह डायरेक्टर वैभव शिरोळे यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lahuji vasatad movie poster
First published on: 13-11-2018 at 17:18 IST