scorecardresearch

Premium

ललित मोदी-सुष्मिता सेन यांचा ब्रेकअप, सोशल मीडियावरील बदलामुळे चर्चांना उधाण

ललित मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर केलेल्या एका बदलामुळे या चर्चांना उधाण आलं आहे.

Lalit Modi Sushmita Sen Breakup
ललित मोदी-सुष्मिता सेन यांचं बिनसलं

Lalit Modi Sushmita Sen Breakup: अभिनेत्री सुष्मिता सेन ही तिच्या बॉलिवूड करिअरसोबतच खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाद्वारे सुष्मिता सेनबरोबरच्या नात्याची कबुली दिली होती. त्यानंतर त्या दोघांच्या नात्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना पाहायला मिळाले. एवढंच नव्हे तर ते दोघे लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र आता त्या दोघांचं बिनसलं असल्याची चर्चा रंगली आहे. ललित मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर केलेल्या एका बदलामुळे या चर्चांना उधाण आलं आहे.

ललित मोदी हे इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असतात. ते नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वी ललित मोदी यांनी सुष्मितासोबतचे फोटो शेअर करत एक ट्वीट केलं होतं. त्यासोबत त्यांनी त्यांच्या नात्याची जाहीर कबुलीही दिली होती. “कुटुंबासोबत मालदीव, सार्दानियाच्या दौऱ्यावरुन नुकताच लंडनला परतलो. यावेळी माझी ‘बेटर हाफ’ सुश्मिता सेनही सोबत होती. अखेर नवी सुरुवात आणि नवं आयुष्य सुरू झालं आहे. माझ्या आनंदाला पारावार उरलेला नाही,” असं ट्वीट मोदी यांनी केलं होतं.
आणखी वाचा : सुष्मिता सेन आणि ललित मोदींच्या रिलेशनशिपवर एक्स बॉयफ्रेंडची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

kamal-haasan-suicidal thoughts
कमल हासन यांच्याही डोक्यात आलेला आत्महत्येचा विचार; तरूणांशी संवाद साधताना अभिनेत्याचा मोठा खुलासा
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
rahul narwekar asim sarode
“अपात्रतेबाबतच्या कारवाईसाठी लागेल तेवढा वेळ घेणार”, नार्वेकरांच्या वक्तव्यावर असीम सरोदे म्हणाले…
marathi actress alka kubal birthday special
अपघातामुळे वजन गेलं शंभरीपार.. अलका कुबल यांनी कशी केली त्यावर मात? वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल
lalit-modi

ललित मोदी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये बदल केला होता. ललित मोदी यांनी इन्स्टाग्राम बायोमध्ये ‘सर्वसामान्य व्यक्तिमत्त्व, इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL चे संस्थापक’ असे लिहिले आहे. “अखेर मी माझ्या नव्या जोडीदारासोबत नवीन आयुष्य सुरु करत आहे. माझे प्रेम सुष्मिता सेन”, असेही त्यांनी त्यांच्या बायोमध्ये नमूद केले आहे.

पण आता ललित मोदी यांनी पुन्हा एकदा त्यांच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये बदल केला आहे. यात त्यांनी सुष्मितासोबतचा प्रोफाईल फोटो बदलला आहे. तसेच त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्रमावरील बायोमधील माहितीही काढली आहे. यावरुनच त्या दोघांचं काही तरी बिनसलं असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. ललित मोदींनी अचानक त्यांचे प्रोफाईल बदलल्याने त्यांचे ब्रेकअप झालं की काय अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

आणखी वाचा : “मी ललित मोदीला जावई म्हणून…”, सुष्मिता सेनच्या रिलेशनशिपवर वडिलांची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान ललित मोदी याचं आधीच एक लग्न झालेलं आहे. मात्र त्यांच्या पत्नीचे २०१८ साली कर्करोगाने निधन झालं. १९९१ साली ललित मोदी आणि मिनल हे लग्नबंधनात अडकले होते. त्यांना दोन मुलंही आहेत. आलिया मोदी आणि रुचिर मोदी अशी त्या दोघांची नावे आहेत. रुचिर ललित मोदींसोबत लंडनमध्ये वास्तव्यास आहे. तर ललित मोदी यांची मुलगी काही दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकली.

तर दुसरीकडे ललित मोदी आणि सुष्मिता सेन बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची घट्ट मैत्री आहे. ते अनेकदा सोशल मीडियावर विविध फोटो व्हिडीओ शेअर करताना दिसतात. विशेष म्हणजे अनेकदा ते दोघे एकमेकांसाठीही पोस्ट शेअर करतात.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lalit modi sushmita sen breakup rumours on social media after ipl founder change social media profile nrp

First published on: 04-09-2022 at 09:51 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×