वंचितांच्या हक्कासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनाने अवघा देश हळहळला होता. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वत्र हंबरडा फुटला. त्यांच्या अंत्ययात्रेला असंख्य जनांचा समुदाय लोटला होता. त्यांच्या अनुयायांच्या हुंदक्यांच्या टाहोने मुंबापुरीचा आसमंत व्यापला होता आणि या सगळय़ा प्रसंगांचे एकमेव साक्षीदार होते नामदेवराव व्हटकर. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अखेरचा प्रवास आपल्या कॅमेऱ्यात टिपणाऱ्या या नामदेवराव व्हटकर यांच्या जीवनावर आधारित ‘महापरिनिर्वाण’ हा चित्रपट प्रेक्षकांना या वर्षांखेरीस पाहायला मिळणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी म्हणजेच ६ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी घडलेल्या गुंतागुंतीच्या भावना व घटनांचा उलगडा करणाऱ्या नामदेवराव व्हटकर यांची भूमिका प्रसाद ओक यांनी चित्रपटात साकारली असून अंजली पाटील, कमलेश सावंत, गौरव मोरे हे कलाकारही या चित्रपटात झळकणार आहेत. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका कोण साकारणार? हे सध्या तरी गुपित आहे. कल्याणी पिक्चर्स प्रस्तुत, अभिता फिल्म निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन शैलेंद्र बागडे यांनी, तर अमर कांबळे यांनी चित्रपटाचे छायाचित्रण केले असून लेखन चेतक घेगडमल यांनी केले आहे. चित्रपटाबद्दल निर्माते सुनील शेळके म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी आम्ही हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहोत. एक कथा दोन इतिहास’ असे या चित्रपटाचे घोषवाक्य आहे. असंख्य जनसागर त्यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी त्यावेळी लोटला होता. यादरम्यान कोणत्या विशेष घटना घडल्या, कोण कोण उपस्थित होते, अशा अनेक गोष्टी ज्या अनेकांना माहिती नाहीत, त्या विस्तृतपणे या चित्रपटात दाखवण्यात येणार आहेत. अवघी मुंबापुरी त्यावेळी थांबली होती. हा मन सुन्न करणारा प्रसंग आपण नामदेवराव व्हटकर यांच्या नजरेतून पाहणार आहोत.’

Mukta Barve danced with Laxmikant berde in the film Khatyal Sasu Nathal Sun
लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबर जबरदस्त नाचली होती मुक्ता बर्वे, अवघ्या चार वर्षांची असताना झळकली होती ‘या’ लोकप्रिय चित्रपटात
sonali khare clarifies age difference between husband and her
“आमच्यात २७ वर्षांचं अंतर नाही”, सोनाली खरेने थेट सांगितली नवऱ्यासह तिची जन्मतारीख; म्हणाली, “बायका त्यांचं वय…”
Sagar Deshmukh suffered a heart attack during the shooting of Bhai Vyakti Ki Valli movie
‘भाई’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आला हृदयविकाराचा झटका अन्…; सागर देशमुखने सांगितला ‘तो’ गंभीर प्रसंग, म्हणाला…
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?