scorecardresearch

Premium

‘माझ्या ‘ब्रा’चं माप देव घेतोय’ म्हणणाऱ्या श्रेता तिवारीची होणार चौकशी; गृहमंत्री पोलिसांना आदेश देत म्हणाले “२४ तासात…”

‘माझ्या ‘ब्रा’चं माप देव घेतोय’ वक्तव्यामुळे श्रेता तिवारी अडचणीत; पोलीस आयुक्त करणार चौकशी

Madhya Pradesh Home Minister Narottam Mishra, TV actress Shweta Tiwari, Bra and God Remark, श्वेता तिवारीचं वादग्रस्त वक्तव्य
'माझ्या 'ब्रा'चं माप देव घेतोय' वक्तव्यामुळे श्रेता तिवारी अडचणीत; पोलीस आयुक्त करणार चौकशी

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीच्या एका वक्तव्यावरुन सध्या मोठा वाद रंगला आहे. श्वेता तिवारीने अंतर्वस्त्रासंबंधी बोलताना देवाचा उल्लेख केल्याने हा वाद सुरु झाला आहे. दरम्यान याप्रकरणी श्वेता तिवारीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून २४ तासात अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे.

श्वेता तिवारीने आपली आगामी बेव सीरिज ‘शो स्टॉपर’च्या प्रमोशनसाठी भोपाळमध्ये आली होती. या वेब सीरिजमध्ये रोहित रॉय, सौरभ जैनदेखील प्रमुख भूमिकेत आहेत. आपल्या सहकलाकारांसोबत मंचावर उपस्थित असताना श्वेता तिवारीने हे वक्तव्य केलं. “माझ्या ब्रा चे माप देव घेत आहे”, असं तिने म्हटलं आणि तेथून वादाला सुरुवात झाली.

Eknath SHinde uddhav Thackeray (3)
“मनोहर जोशींचं घर जाळण्यासाठी…”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; म्हणाले, “पंतांना भर सभेत…”
dog
कुत्र्याला अमानुष मारहाण; प्राणी संरक्षण कायद्यात बदल होणार?
ajit pawar
भर सभेत अजित पवारांचे मुख्यमंत्रिपदावर भाष्य, कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले; “बाबांनो जरा…”
Loksatta chaturanga Governor Ramesh Bais Consider changing school timings
शाळेची वेळ: सकाळची की दुपारची?

“माझ्या ब्रा चे माप…”, अभिनेत्री श्वेता तिवारीने ब्रा साईज आणि देवाबद्दल केले वादग्रस्त वक्तव्य

श्वेता तिवारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

ही एक फॅशनशी संबंधित वेब सीरिज आहे. यामध्ये महाभारतामध्ये कृष्णाची भूमिका करणारे सौरभ जैन दिसणार आहेत. यामध्ये ते ब्रा फिटरच्या भूमिकेत असतील असं एएनआयने म्हटलं आहे. सौरभ यांच्यासंबंधी बोलताना श्वेता तिवारीने हे वक्तव्य केलं.

दरम्यान गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना प्रसारमाध्यमांनी या वक्तव्यासंबंधी विचारलं असता त्यांनी मी हे वक्तव्य ऐकलं आणि पाहिलं असून त्याचा निषेध करतो असं सांगितलं. ते म्हणाले की, “मी भोपाळच्या पोलीस आयुक्तांना याप्रकरणाची चौकशी करत २४ तासात अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. त्यानंतर आम्ही काय कारवाई करायची याचा निर्णय घेऊ”.

दरम्यान यापूर्वीही अनेकदा श्वेता तिवारी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ती तिच्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत येत असते. दोन लग्न आणि घटस्फोटामुळे श्वेताचं खासगी आयुष्य चर्चेत राहिलं आहे. १९९८ सालामध्ये श्वेता तिवारीने अभिनेता राजा चौधरीसोबत लग्न केलं होतं. त्यांना पलक ही मुलगी आहे. तर २००७मध्ये श्वेता आणि राजा विभक्त झाले. राजा चौधरीवर श्वेता तिवारीने हिंसाचाराचा आरोप केला होता.

त्यानंतर श्वेताने २०१३ सालामध्ये अभिनेता अभिनव कोहलीसोबत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. श्वेता आणि अभिनवला रेयांश नावाचा मुलगा आहे. तर अभिनवदेखील हिंसाचार करत असून छळ करत असल्याचा आरोप श्वेताने केला होता. त्यानंतर २०१९ सालामध्ये श्वेताने अभिनवला घटस्फोट दिला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Madhya pradesh home minister narottam mishra direct police to investigate tv actress shweta tiwari bra and god remark sgy

First published on: 28-01-2022 at 08:23 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×