हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरू, सायली संजीव, क्षिती जोग आणि सिद्धार्थ चांदेकर या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सात बायकांच्या रियुनियनची गोष्ट प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. अनेक कलाकार मंडळींनी पोस्ट शेअर करत ‘झिम्मा २’ कौतुक केलं आहे.

अभिनेत्री हेमांगी कवीने सुद्धा नुकताच ‘झिम्मा २’ चित्रपट पाहिला. हा चित्रपट पाहिल्यावर अभिनेत्रीने फेसबुकवर भलीमोठी पोस्ट शेअर करून यामधील कलाकारांचं कौतुक केलं आहे. चित्रपटाचं कथानक, यामधील कलाकार, झिम्माच्या लेखिका याविषयीचं सविस्तर वर्णन हेमांगीने या पोस्टमध्ये केलं आहे. तसेच आता आमच्यासाठी ‘झिम्मा ३’ बनव व ‘झिम्मा’ चित्रपटाच्या मालिकेला अंत देऊ नकोस अशी विनंती अभिनेत्रीने चित्रपटाचा दिग्दर्शक हेमंत ढोमेकडे या पोस्टद्वारे केली आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा : Video : निवेदिता सराफ यांचं आवडतं पर्यटनस्थळ कोणतं? अशोक मामांचं उत्तर ऐकून भर कार्यक्रमात पिकला एकच हशा!

हेमांगी कवीची पोस्ट

मला तर बाई लय मंजी लय मज्जा आली!

हेमंत ढोमे…अरे काय कमाल सिनेमा आहे! Frankly speaking ‘झिम्मा १’ पेक्षा ‘झिम्मा २’ जास्त जमून आलाय. कदाचित या बायकंना आम्ही झिम्मा १ पासून ओळखत होतो म्हणून हे मला वाटलं असेल. प्रत्येकीची गोष्ट वेगळी पण तितकीच प्रभावी आणि relatable! विचार करायला लावणारी आणि आचरणात आणायला कुठेही कठीण न करता सहजपणे आपल्यात बदल करू शकणारी! खरंच मज्जा आली. प्रचंड enjoy केला मी हा सिनेमा!

निर्मिती सावंत!!!! काय करायचं या बाईचं! म्हणजे मला काही सुचेचना! कसं कसं करतेस गं तू! इतक्या वर्षांपासून कसं गं हे अबाधित ठेवलंयस?
आपल्याकडे विशिष्ट वयानंतर अभिनेत्रीला lead किंवा Heroine म्हणून बघितलं जात नाही. पटकन चरित्र कलाकार, सहाय्यक कलाकार म्हणून आपण लगेच categories करतो. Hollywood किंवा इतर कुठेही असं होत नाही. मोठ्या वयाच्या अभिनेत्रींना Lead म्हणूनच पाहिलं जातं. Awards साठी main category मध्ये गणलं जातं. ही गोष्ट जर आपल्या इथं सुरू झाली तर त्याला तू कारणीभूत असशील ताई. इतकं भारी काम केलंयस तू!

सुहास ताई, हीच गोष्ट ‘तू तिथं मी’ च्या वेळी वाटली होती. आणि आज ही तुमची इंदू पाहून वाटलं! तो line मारायचा scene! मी तर शिट्टीच हाणली theatre मध्ये. क्या बात है!

दुसरं कौतुक करावंसं वाटतं ते रिंकू राजगुरुचं. खूप समजून- उमजून काम केलंय. Typical सून न करता एकदम छान तान्या साकारली आहे. Screen वर दिसताच आपसूक आमच्या चेहऱ्यावर smile येत होतं. थोडक्यात या सासू-सूनेने लयच धमाल आणलीए!

एक एक scene चोपलाय तिघींनी!

जाता जाता एवढंच सांगेन हेमंत ढोमे आता आम्हांला झिम्मा ३ हवाय. हवाय म्हणजे हवायययययय!
ते तू बाकी सिनेमे करत रहा पण झिम्मा universe ला अंत देऊ नकोस! फार फार तर काय होईल एखादा part फसेल! ठिक आहे की. पण हा खेळ थांबवू नकोस एवढीच विनंती तुझ्या सगळ्या team कडे.
इरावती कर्णिक, क्षितिज पटवर्धन कमाल कमाल! कमाल!

हेही वाचा : “चुकीचा निर्णय…”, ‘३६ गुणी जोडी’मालिकेच्या वेळेत तिसऱ्यांदा केला बदल, नेटकरी संतप्त होत म्हणाले…

दरम्यान, सध्या ‘झिम्मा २’ चे कलाकार चित्रपटगृहांना भेट देऊन प्रेक्षकांचा उत्साह वाढवत आहेत. चित्रपटाचा प्रत्येक शो हाऊसफुल्लं असल्याचं कलाकारांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. ‘झिम्मा २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आतापर्यंत ६ कोटींहून अधिक कमाई केली आहे. यापूर्वी २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या झिम्माच्या पहिल्या भागाला सुद्धा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

Story img Loader