scorecardresearch

Premium

‘झिम्मा २’चा बॉक्स ऑफिसवर जलवा! चार दिवसांत केली ‘एवढी’ कमाई

Jhimma 2 Collection Day 4 : ‘झिम्मा २’ने चौथ्या दिवशी किती कमाई केली? घ्या जाणून…

jhimma-2-box-office-collection
'झिम्मा २' बॉक्स ऑफिस कलेक्शन

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ चित्रपट २४ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाच्या कथेबरोबर त्यातील गाण्यांनाही प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळताना दिसत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली होती. आता चित्रपटाच्या चौथ्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

हेही वाचा- “धर्मवीर दोन”मधून २०२४ची पायाभरणी? पहिल्यातून बंडाचे निशाण, दुसऱ्यातून नेतृत्वावर शिक्कामोर्तब?

Mugdha Vaishampayan shared a special post for her sisters husbands
“Happy Birthday जीजू”, मुग्धा वैशंपायनने बहिणीच्या नवऱ्याला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; म्हणाली…
man gotten 100 free meals grom mcdonald using unlimited desi jugaad chatgpt hack post viral
महागड्या रेस्टॉरंटमधून १०० दिवस केली जेवणाची मोफत ऑर्डर; Photo शेअर करीत सांगितली फुकटात खाण्याची ट्रिक
Anti valentine day date and how to celebrate
स्लॅप डे, किक डे अन् ….; कसा साजरा केला जातो ‘Anti-Valentine’s Week’ जाणून घ्या
water shortage, panvel, solve, citizens, marathi news,
पनवेलकरांची पाणी टंचाईची समस्या निकालात निघणार…

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ‘झिम्मा २’ने ०.९५ कोटीची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने १.७७ कोटीचा गल्ला जमवला होता. तिसऱ्या दिवशी ‘झिम्मा २’ने २.०५ कोटींचा व्यवसाय केला. मात्र, आठवड्याची सुरुवात असल्याने चौथ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत थोडी घसरण बघायला मिळाली. चौथ्या दिवशी चित्रपटाने ०.७५ कोटीची कमाई केली आहे. चार दिवसांमधील ही सगळ्यात कमी कमाई आहे. आतापर्यंत या चित्रपटाने एकूण ५.५२ कोटींचा गल्ला जमवला आहे.

‘झिम्मा २’ बघण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये गर्दी करीत आहेत. या चित्रपटाचे सगळेच शो हाऊसफुल्ल होताना दिसत आहेत. दिवसेंदिवस प्रेक्षकांमध्या या चित्रपटाची क्रेझ वाढताना दिसत आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता, ‘झिम्मा २’ बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा- खळखळ वाहणारी नदी, ट्रेकिंग अन्…; आकाश ठोसर रमला निसर्गरम्य वातावरणात, कॅप्शन चर्चेत

झिम्मा २ या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, निर्मिती सावंत, सायली संजीव, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरू यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २०२१ मध्ये या चित्रपटाचा पहिला भाग ‘झिम्मा’ प्रदर्शित झाला होता. ‘झिम्मा’नेही बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hemant dhome jhimma 2 box office collection day four dpj

First published on: 28-11-2023 at 12:01 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×