“काम हीच एनर्जी” असं म्हणून मराठी सिनेसृष्टीवर दोन दशकाहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे अभिनेते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. अभिनयाचं इतकं वेड की तीन-तीन शिफ्टमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे काम करायचे. कामावरील त्यांच्या निष्ठेने त्यांना ‘सुपरस्टार’ केलं. मराठी सिनेसृष्टीत लक्ष्मीकांत यांचं नावं जितकं अदबीने घेतलं जात, तितकंच हिंदी सिनेसृष्टीतही त्यांना मानलं जात. त्या काळात चहूबाजूला त्यांच्याच नावाचा बोलबोला असला तरी त्यांना कधीच गर्व, अहंकार नव्हता. आजकाल काही सुपरस्टार्स त्यांच्या चाहत्यांना फारशी बरी वागणूक देत नाहीत. यासंबंधित आपण अनेक व्हिडीओ पाहतो. तसंच काही वेळेला सुरक्षा रक्षकांमुळे चाहत्यांना त्यांच्या आवडत्या स्टार्सना भेटता येत नाही. पण त्याकाळात एखादा कलाकार ‘सुपरस्टार’ असला तरी त्याच्या भोवती सुरक्षा रक्षकांचा गरडा अधिक नसायचा. तरी देखील ते ‘सुपरस्टार्स’ चाहत्याबरोबर विनम्रपणे वागायचे. त्यापैकी एक म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. आज लक्ष्मीकांत बेर्डे यांचा स्मृतिदिन. याचनिमित्ताने आज आपण त्यांच्या चाहत्यांचे काही किस्से जाणून घेऊयात. दूरदर्शन सह्याद्रीच्या ‘चंदेरी सोनेरी’ कार्यक्रमात लक्ष्मीकांत बेर्डे यांनी स्वतः त्यांच्या चाहत्यांचे हे किस्से सांगितले होते.

‘एक होता विदूषक’ चित्रीकरणादरम्यान लक्ष्मीकांत बेर्डेंच्या गाडीवर चढले चाहते तरी देखील….

sharad pawar family
“माझ्या नणंदेची जागा…”, शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शर्मिला पवारांचं समर्थन; म्हणाल्या, “सुप्रियाताई जन्माने…”
sharad pawar replied to narendra modi
नरेंद्र मोदींच्या ‘अतृप्त आत्मा’ टीकेवर शरद पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “त्यांचे म्हणणं खरं आहे, पण…”
man kidnapped and burnt to killed in gujarat over instagram status
पुणे: ‘म्हाळुंगे किंग’ पोस्ट जीवावर बेतली; अपहरण करून गुजरातमध्ये जाळून केली हत्या, वाचा सगळा घटनाक्रम
Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार

जब्बार पटेल दिग्दर्शित ‘एक होता विदूषक’ चित्रपटाच्या चित्रीकरणदरम्यान लक्ष्मीकांत बेर्डेंच्या चाहत्यांनी हंगामा केला होता. साताऱ्यातल्या एका नदीकाठी या चित्रपटातील एका सीनचं चित्रीकरण होत. या सीनमध्ये लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहिजे होती. म्हणून जब्बार पटेल यांनी एक चांगली शक्कल लढवली. त्यांनी लोकांची गर्दी जमवण्यासाठी चित्रीकरणाची जाहिरात दिली. त्यामुळे या सीनला प्रत्यक्ष ठिकाणी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. आबुरावच्या आईच्या १०व्याचा तो सीन होता. तेव्हा आबुराव हा मोठा स्टार झालेला असतो. त्यामुळे त्याला पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केलेली असते. हीच गर्दी दाखवण्यासाठी जब्बार पटेल यांनी चित्रीकरणाची जाहिरात दिली होती. हा सीन त्यांच्या मनाप्रमाणे चित्रीत झाला.

हेही वाचा – ‘मॅन विदाऊट शॅडो’ ते ‘दुर्वा’; वाचा विनय आपटेंचा आजवरचा प्रवास अन् किस्से

चित्रीकरणाच्या ठिकाणी लोकांप्रमाणे गाड्यांची संख्या देखील मोठी होती. त्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डेंची नवी गाडी सामील होती. जेव्हा चित्रीकरण संपवून लक्ष्मीकांत घरी परतण्यासाठी निघाले तेव्हा चाहत्यांनी त्यांना पाहण्यासाठी एकच गर्दी केली. त्या गर्दीतून ते कसेबसे गाडीपर्यंत पोहोचले आणि आत जाऊन बसले. पण तेव्हा चाहते मर्यादा ओलांडून त्यांच्या गाडीवर चढले अन् जोरजोरात गाडीवर मारू लागले. चाहत्यांच्या या गोंधळामुळे लक्ष्मीकांत बेर्डे वैतागले. ते गाडीतून खाली उतरून मार्मिक विनोदी शैलीत म्हणाले, “ही घ्या गाडी चावी, तोडून टाका. ही गाडी माझी नाहीये. तुमच्याच पैशावर घेतलेली गाडी आहे.” लक्ष्मीकांत यांचं बोलणं ऐकून चाहते गाडीवरून खाली उतरले. त्यानंतर गर्दीमधले दोन-तीन जण पुढे आले आणि त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना जाण्यासाठी जागा करून दिली.

हृदयस्पर्शी चाहतीचा किस्सा

लक्ष्मीकांत बेर्डे यांचं पुण्याला एकाबाजूला चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं, तर दुसऱ्याबाजूला त्यांच्या नाटकाचे प्रयोग सुरू होते. एकेदिवशी चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर संध्याकाळी ५ आणि रात्री ९.३०चा नाटका प्रयोग लागला होता. ९.३०चा प्रयोग हा रात्री बारा-साडे बाराला संपला. चित्रीकरण व प्रयोग करून लक्ष्मीकांत थकले होते. ते निवांत एका खोलीत बसले होते. तितक्यात एक व्यक्ती त्यांच्या खोलीत आला. त्या व्यक्तीला त्याच्या पत्नीची भेट लक्ष्मीकांत यांच्याशी करून द्यायची होती. त्यामुळे त्या व्यक्तीने लक्ष्मीकांत यांना आपल्या पत्नीला भेटण्यासाठी बाहेर येण्याची विनंती केली. पण ते थकल्यामुळे त्यांनी त्या व्यक्तीला पत्नीला आत घेऊन यायला सांगितलं. मग त्या व्यक्तीने पत्नी व्हिलचेअरवर असल्याचं सांगितलं. हे ऐकताच लक्ष्मीकांत बेर्डे चटकन उठले. ते थकलेत याचा विचार त्यांनी अजिबात केला नाही. ते धावत त्या व्यक्तीच्या पत्नीला भेटायला गेले. त्या व्यक्तीची पत्नी लक्ष्मीकांत बेर्डे यांची खूप मोठी चाहती होती. तिने ‘शांतेच कार्ट चालू आहे’, ‘टूरटूर’ ही नाटकं २५ ते ३० वेळा पाहिली होती. लग्नाआधी ती चाहती व्यवस्थित होती. पण लग्नानंतर तिचा भीषण अपघात झाला. ज्यामध्ये तिने दोन पाय गमावले. या अपघाताच्या धक्कामुळे ती चाहती जवळपास वर्षभर बोलत नव्हती. पण यादरम्यान तिने लक्ष्मीकांत बेर्डे यांचा टीव्हीवरील पाणी टंचाईचा ‘गजरा’ पाहिला आणि ती हसायला लागली. त्यानंतर ती लक्ष्मीकांत बेर्डेंची चाहती झाली. ती त्यांचे टीव्हीवरील कार्यक्रम, नाटक, चित्रपट पाहायला लागली. लक्ष्मीकांत यांच्यामुळे ती हसू लागली अन् तिने आयुष्याला पुन्हा नव्याने सुरुवात केली. त्यामुळे तिचा पती, हे सगळं तुमच्यामुळे घडलं, असं म्हणतं लक्ष्मीकांत बेर्डेंचे आभार व्यक्त करू लागला. तेव्हा लक्ष्मीकांत म्हणाले, “हे सगळं माझ्यामुळे नाही. माझ्या विनोदामुळे. माझ्यामुळे जर त्यांना बरं वाटतं असेल तर खरंच चांगली गोष्ट आहे.”

हेही वाचा – मी आलो.. मी पाहिलं.. मी लढलो.. मी जिंकून घेतलं सारं

रुग्णांना हसवण्यासाठी व्यग्र वेळापत्रकातून काढायचे वेळ

एकदा लक्ष्मीकांत यांचा शिवाजी मंदिरात नाटकाचा प्रयोग होता. हा प्रयोग संपताच त्यांच्या खोलीत एक माणूस आला अन् म्हणाला, “व्वा बेर्डेसाहेब अडीच तास सगळं विसरलो.” लक्ष्मीकांत बेर्डे यांनी विचारलं “असं का?” तर त्या माणसाने सांगितलं, त्याच्या घरामध्ये त्याला सोडून सगळे आजारी होते. त्याच्या खिशात फक्त पाच रुपये होते. औषधाला पैसेचं नव्हते. इथे येऊन पाहिलं तर लक्ष्मीकांत बेर्डेंचं नाटक लागलं होतं. अडीच तास विसरून गेलो घरी कोणी आजारी आहे.

दरम्यान, बऱ्याचदा रुग्णाच्या मनोरंजनासाठी व इच्छेसाठी लक्ष्मीकांत यांना रुग्णालयात बोलावलं जायचं. काही कॅन्सर रुग्ण किंवा इतर रुग्ण ज्यांचे शेवटचे दिवस बाकी होते, त्यांना लक्ष्मीकांत यांना बघायची इच्छा असायची. म्हणून लक्ष्मीकांत त्यांच्या व्यग्र वेळापत्रकातून कसंही करून त्या रुग्णांना हसवण्यासाठी जायचे. असे प्रसंग पाहून खरंच आपण लोकांसाठी काहीतरी करतोय, असं त्यांना वाटतं असे. असा हा खळखळून हसवणारा नट १६ डिसेंबर २००४ रोजी जग सोडून निघून गेला. किडनीच्या आजाराने लक्ष्मीकांत बेर्डे यांचं अकाली निधन झालं. लक्ष्यामामांची ही अचानक एक्झिट चटका लावून जाणारी होती.