मराठी चित्रपटसृष्टीतील लगीनघाई सुरू आहे. अनेक कलाकार लग्नबंधना अडकत आहेत, तर काही साखरपुडा करत आहेत. याचदरम्यान अभिनेत्री भाग्यश्री मोटेने तिचा साखरपुडा मोडल्याची घोषणा केली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जोडीदाराशी लग्न करणार नसून ब्रेकअप झाल्याचं स्पष्ट केलं आहे.

भाग्यश्री मोटे हिने १० ऑक्टोबर २०२२ रोजी विजय पालांडेबरोबर साखरपुडा केला होता. गेल्या काही वर्षांपासून ते दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. साखरपुड्यानंतर जवळपास दीड वर्षांनी ती व विजय वेगळे झाले आहेत. तिने यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. “मी सर्वांना सांगू इच्छिते की बराच काळ एकमेकांबरोबर राहण्याचा प्रयत्न केल्यानंतर मी आणि विजयने चांगल्या कारणांसाठी वेगळं व्हायचं ठरवलं आहे. पण आम्ही चांगले मित्र राहू. कृपया आमच्या प्रायव्हसीचा आदर करा. धन्यवाद,” असं भाग्यश्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिलं आहे.

rasika vengurlekar and these marathi actors cast on bollywood movie munjya
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्रीचं नशीब उजळलं! बॉलीवूडमध्ये मिळाली संधी; चित्रपटात मराठी कलाकारांची मांदियाळी
Rashmika Mandanna on atal setu
रश्मिका मंदानानं अटल सेतूचं कौतुक करताच काँग्रेसची खोचक पोस्ट; ‘गुड जॉब’ म्हणत दिली सविस्तर आकडेवारी!
Actress Sonali Kulkarni exercised her right to vote in nigadi
मावळ: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने निगडीत बजाविला मतदानाचा हक्क, म्हणाली “लोकांचा कोणावरच…”
madhoo relation with hema malini juhi chawla
माहेरी हेमा मालिनी तर सासरी जुही चावलाची नातेवाईक आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री; म्हणाली, “त्यांनी माझ्या पतीच्या…”
Sanskruti Balgude is a fan of siddharth menon will work together in a film
संस्कृती बालगुडे आहे ‘या’ अभिनेत्याची फॅन; दोघंही लवकरच झळकणार एका चित्रपटात, अभिनेत्री म्हणाली, “…आणि शेवटी ते झालंय”
sakshi Tanwar
सीबीआय अधिकाऱ्याची लेक, IAS व्हायचं स्वप्न पण झाली अभिनेत्री; ५१ व्या वर्षीही अविवाहित ‘प्रिया’ आहे एका मुलीची आई
fearless Nadiya first Indian stunt woman
कोण होती पहिली भारतीय ‘स्टंटवूमन?’ का म्हटले जायचे तिला ‘हंटरवाली’? जाणून घ्या ही माहिती
Prajakta mali namrata sambherao and Maharashtrachi Hasyajatra Women dance On Nach Ga Ghuma Song
Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अभिनेत्रींचा ‘नाच गं घुमा’ चित्रपटाच्या टीमबरोबर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

बॉयफ्रेंडशी गुपचूप लग्न करण्याबाबत तापसी पन्नूने सोडलं मौन, म्हणाली, “फोटो किंवा व्हिडीओ शेअर करण्याचा…”

विजय पालांडे हा लोकप्रिय मेकअप आर्टिस्ट आहे. त्याने आजवर अनेक सेलिब्रिटींबरोबर काम केलं आहे. भाग्यश्री व विजय यांनी कधीच आपलं नातं लपवलं नव्हतं. ते सोशल मीडियावर एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करायचे. दोघांनी दीड वर्षांपूर्वी थाटामाटात साखरपुडा केला होता. त्यांच्या साखरपुड्याला अभिनेता हृतिक रोशनने हजेरी लावली होती.

साखरपुडा केल्यानंतर दीड वर्षांनी भाग्यश्रीने ब्रेकअपची घोषणा केली आहे. ती व विजय चांगल्या कारणांसाठी वेगळे होत असल्याचं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.