अभिनेत्री क्षिती जोगनं मालिका, नाटक, चित्रपट आणि वेब सीरिज या चारही माध्यमातून आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवला आहे. फक्त मराठीतच नाही तर हिंदी सिनेसृष्टीत क्षितीनं एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटातील तिच्या भूमिकेचं खूप कौतुक करण्यात आलं होतं. त्यानंतर क्षिती ‘झिम्मा २’ चित्रपटात पाहायला मिळाली. आपल्या सहसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी क्षितीनं नुकतंच एका मुलाखतीमध्ये मंगळसूत्र घालण्याबाबत स्पष्ट मत मांडलं.

अभिनेत्री क्षिती जोग ‘आरपार’ या युट्यूब चॅनलच्या ‘वूमन की बात’ या कार्यक्रमात सहभागी झाली होती. या कार्यक्रमात तिने लग्नानंतरचा एक किस्सा सांगत मंगळसूत्र घालण्याबाबत स्पष्टच बोलली. नेमकं क्षिती काय म्हणाली? वाचा…

हेही वाचा – Video: दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटेंच्या मुलाच्या हातावर सजली होणाऱ्या बायकोच्या नावाची मेहंदी, पाहा व्हिडीओ

क्षिती म्हणाली, “मी कुठेतरी गेले होते. तेव्हा मी मंगळसूत्र घातलं नव्हतं. लग्नानंतर एक दीड वर्षात कुठल्यातरी कार्यक्रमाला गेले होते. तू मंगळसूत्र नाही घातलं? तुझं नुकतंच लग्न झालंय ना?, असं विचारायला लागले. म्हटलं, त्याला माहितीये ना मी त्याची बायको आहे आणि मला माहिती आहे ना तो माझा नवरा आहे. तुला माहित असो किंवा नसो. मला काय फरक पडतोय. म्हणजे ते घातल्याने काय होणार आहे? मला मंगळसूत्र खूप आवडतं. तो खूप सुंदर दागिना आहे, असं माझं मत आहे. पण ते माझ्या मनावर आहे. माझ्या मनात असेल तेव्हा मी साडी, गजरा, टिकली, सगळं म्हणजे बापरे आणि नाही तर नाही. पण मी हे तुमच्यासाठी करत नाही. मी माझ्यासाठी करते. मला माहिती आहे. माझं लग्न झालंय. मंगळसूत्र घातलं काय किंवा न घातलं काय.”

हेही वाचा – Video: ‘जुळून येती रेशीमगाठी’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात; आस्ताद काळे, मेघा धाडेसह ‘या’ मराठी कलाकारांनी लावली होती खास हजेरी

“मग ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ते त्याला (नवऱ्याला) नाही विचारत? की अरे तुझं लग्न झालंय ती मुलगी किती छान दिसते असं का म्हणालास तू? असं नाही होतं ना म्हणजे तो सहज गप्पा मारतो ना. अरे ही किती छान दिसते, ते चालतं. तर असे बोर लोकं असतात. त्यांना माझ्या मते वेल्ला टाइम असतो वेल्ला. आणि घरी वेळीच लहानपणी आईने फटके नाही घातले ना. मला तर नेहमी असं वाटतं, आईने वेळीच धपाटे घालते असते ना तर ही वेळ नसती आली,” असं क्षिती म्हणाली.