Premium

“उद्या तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस…”; नम्रता संभेरावची प्रसाद खांडेकरसाठी खास पोस्ट, म्हणाली “आता तुझंही नाव…”

नम्रता संभेरावची प्रसाद खांडेकरसाठी खास पोस्ट, म्हणाली “आता तुझंही नाव…”

नम्रता संभेराव प्रसाद खांडेकर

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता प्रसाद खांडेकर हा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री नम्रता संभेरावने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने प्रसाद खांडेकरचे कौतुक केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नम्रता संभेरावने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात ती आणि प्रसाद खांडेकर दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना तिने ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटाला आणि प्रसाद खांडेकरला शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा : सुरुची अडारकर आणि पियुष रानडेच्या लग्नाच्या रिसेप्शनचे फोटो समोर, पोस्ट शेअर करत म्हणाली…

नम्रता संभेरावची पोस्ट

“फाल्गुन अश्विनी, उद्या तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस, तू दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा प्रदर्शित होतोय , तुझं अनेक स्वप्नांपैकी एक स्वप्न पूर्ण होतंय, तुला खूप शुभेच्छा पश्या. कमाल झालाय सिनेमा, पहिला चित्रपट जर असा असेल तर इथून पुढचे सगळे चित्रपट तू असेच यशस्वीरीत्या दिग्दर्शित करशील ह्याची खात्री आहे मला, त्याची मी साक्षीदार आहे ह्याचा अतोनात आनंद होतोय, असंच passionately काम करत रहा, तुझ्यातली सकारात्मक ऊर्जा खूप शिकवून जाते नेहमीच, असाच रहा खूप मोठा हो.

चित्रपट दिग्दर्शकांच्या फळीत आता तुझंही नाव लागणार, खूप अभिमान वाटतोय तुझा, तुला पुढच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा पश्या, ८ डिसेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात बघायला नक्की जा , @bookmyshow वर tickets available आहेत लवकरात लवकर तिकिट्स बुक करा आणि एक धमाल laughter ride अनुभवा”, असे नम्रता संभेरावने म्हटले आहे.

आणखी वाचा : पियुष रानडेबरोबर लग्नगाठ बांधल्यानंतर सुरुची अडारकरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…

दरम्यान ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात तब्बल १६ विनोदवीर कलाकार भूमिका साकारणार आहेत. यात सयाजी शिंदे, गिरीश कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, भाऊ कदम, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार, पॅडी कांबळे, राजेंद्र शिसटकर, वनिता खरात, रोहित माने, शशिकांत केरकर, सुशील इनामदार, जय चौबे, राकेश शालिन यांचा समावेश आहे. हा बहुचर्चित चित्रपट येत्या ८ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi actress namrata sambherao best wish to co actor prasad khandekar ekda yeun tar bagha movie nrp

First published on: 07-12-2023 at 20:19 IST
Next Story
Video रोमँटिक डेट, कॅन्डललाईट डिनर अन्… लग्नाच्या वाढदिवसानिमित्त प्रवीण तरडेंना बायकोने दिलं खास सरप्राईज, व्हिडीओ व्हायरल