महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या आठ वर्षांत खूप उलथापालथ झाली आहे. आता याच राजकीय नाट्याचा थरार आगामी ‘चाणक्य’ या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. येत्या २०२३ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्रातील राजकीय महानाट्यांचा हा वास्तवदर्शी चरित्रपट आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

नुकतंच दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित केले आहे. या पोस्टरवर सभेसाठी जमलेल्या प्रचंड मोठ्या जनसमुदायासमोर भाषण करणारा एक नेता दाखवण्यात आला आहे. तर त्याच्या पाठीत खुपसलेला खंजीर हे दृश्य चित्रपटाच्या पोस्टरवर दिसत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांतील राजकारणातील थरारनाट्य “चाणक्य” चित्रपटातून उलगडणार असल्याचं स्पष्ट होतं. या चित्रपटाच्या पोस्टरमुळे चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. राजकीय क्षेत्रातही अनेक अंदाज बांधले जाऊ लागले आहेत.
आणखी वाचा : Video : जॅकी श्रॉफ यांना पाहताच अमित ठाकरेंनी घेतला आशीर्वाद; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव, व्हिडीओ व्हायरल!

rajkaran gela Mishit marathi movie on April 19 in theaters
‘राजकारण गेलं मिशीत’ १९ एप्रिलला चित्रपटगृहात
The Kerala Story triggering political drama in Kerala In Loksabha Polls 2024
‘द केरला स्टोरी’चा राजकीय आखाड्यात प्रवेश; केरळमधील वातावरण तापले; वाचा नक्की काय आहे प्रकरण!
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त निर्माते निलेश नवलाखा यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. निलेश नवलाखा यांनी मराठी चित्रपटांना वास्तवाजवळ नेऊन चित्रपटसृष्टीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर ते आता स्वतः लेखन आणि दिग्दर्शनाकडे वळले आहेत. पहिल्याच चित्रपटासाठी त्यांनी महाराष्ट्रातलं राजकारण या ताज्या आणि सामान्य माणसांच्या कल्पनेपलीकडील उलथापालथींना भरलेल्या धारदार अशा ‘पोलिटिकल थ्रिलर’ विषयाची निवड केली आहे.

आणखी वाचा : “मी हा चित्रपट…” ‘महाभारता’त कृष्णाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची ‘आदिपुरुष’च्या टीझरवर प्रतिक्रिया

‘चाणक्य’ या चित्रपटाद्वारे ते दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत. तसेच चित्रपटाची निर्मितीही ते स्वत: करत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामुळे उद्ध्वस्त झालेल्या एका कुटुंबाची आणि राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी आखलेले कट-कारस्थान, शह-काटशह, राजकीय सूडनाट्‌य आणि गद्दारीची गोष्ट या चित्रपटाद्वारे उलगडणार आहे.

येत्या २०२३मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचं धडाकेबाज पोस्टर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर लाँच करण्यात आले. नवलाखा आर्ट्स मीडिया अँड एंटरटेनमेंट च्या माध्यमातून निलेश नवलाखा यांनी “शाळा,” अनुमती आणि “फँड्री” या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांची निर्मिती केली आहे. तसेच त्यांनी निर्मिती केलेल्या “राक्षस” या चित्रपटाचंही कौतुक झालं होतं.