मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांचा लग्नसोहळा २८ फेब्रुवारी २०२४ रोजी थाटामाटात पार पडला. पूजाच्या मेहंदी, संगीत, हळद, लग्न व रिसेप्शन सोहळ्यात मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी हजेरी लावली होती. याचे व्हिडीओ आणि फोटोज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. लग्नानंतर पूजा सावंतच्या सासरी म्हणजेच सिद्धेशच्या घरी सत्यनारायणाची पूजा पार पडली आणि आता हे नवविवाहित जोडपं देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी सिद्धिविनायकला पोहोचले आहेत.

लग्नाचे विधी झाल्यानंतर पूजा आणि सिद्धेश आता सिद्धिविनायकाच्या चरणी बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी दादरला पोहोचले आहेत. या जोडप्याने बाप्पाचे दर्शन घेत पुढील आयुष्यासाठी प्रार्थना केली. याचे फोटोज पूजाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. या स्टोरीमध्ये सिद्धेशला टॅग करत इन्फीनिटी आणि एव्हिल आयचा इमोजी पूजाने वापरला आहे.

amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”
Anand Mahindra speaks about his daughter suffered an injury moment Harsh Goenka agrees Watch Ones
लेकीच्या दुखापतीच्या ‘त्या’ प्रसंगाने आनंद महिंद्रांना शिकवला ‘हा’ धडा; म्हणाले, ‘घराच्या अंगणात…’
RCB Won WPL 2024 Trophy
WPL 2024 : आरसीबीने जेतेपद पटकावल्याबद्दल प्रतिक्रियांचा महापूर, कोहलीपासून ते लक्ष्मणपर्यंत ‘या’ सर्वांनी केले कौतुक

बाप्पाच्या दर्शनासाठी पूजाने लाल रंगाचा काठ असलेली निळ्या रंगाची पैठणी नेसली आहे. हिरवा चुडा, मेहंदी, मंगळसूत्र अशा मराठमोळ्या रुपात नववधूचं सौंदर्य अगदी खुलून दिसतंय. यात सिद्धेशने लाल रंगाचा कुरता आणि सफेद पायजमा घातला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना पूजाने सांगितले की, ‘लग्नापूर्वी बऱ्याचदा आले आहे, तेसुद्धा चित्रपटासाठी. पण, आज खूपच स्पेशल आहे. लग्नानंतर आम्ही आताच दर्शनासाठी आलो आहोत.’ तर सिद्धेशने सांगितले, ‘मीदेखील सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी खूप वेळा आलो आहे. गणपती बाप्पा माझे फेवरेट आहेत. मी नेहमी दर्शनासाठी येतच असतो.’ दोघंही हातात हात घालून मंदिराच्या बाहेर पडताना दिसले.

हेही वाचा… VIDEO: प्री-वेडिंग सोहळ्यात अनंत अंबानीच्या ‘त्या’ कृतीने पाणावले मुकेश अंबानींचे डोळे; व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, २८ नोव्हेंबर २०२३ रोजी पूजाने तिचा आणि सिद्धेशचा पोठमोरा फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांच्या नात्याची कबुली दिली. पूजाने प्रेमाची कबुली दिल्यापासून सोशल मीडियावर पूजाच्या लग्नाची जोरदार चर्चा होती. १६ फेब्रुवारीला दोघांचा साखरपुडा नातेवाईक आणि मित्रपरिवारासमवेत पार पडला. तर दोघांच्या लग्नसोहळ्याला प्रार्थना बेहेरे, अभिषेक जावकर, शाल्मली टोळ्ये, भूषण प्रधान, सुखदा खांडकेकर, गौरी महाजनी यांसह अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती.