महाराष्ट्राची ‘कलरफूल’ अभिनेत्री पूजा सावंतचा विवाहसोहळा फेब्रुवारी महिन्यात मोठ्या थाटामाटात पार पडला. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात सोशल मीडियावर फोटो शेअर करत अभिनेत्रीने प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. यानंतर सर्वत्र पूजाच्या लग्नाची चर्चा रंगली होती. साखरपुडा, मेहंदी, हळद असे सगळे विधी पार पडल्यावर पूजाने सिद्धेश चव्हाणबरोबर २८ फेब्रुवारीला लग्नगाठ बांधली.

सध्या लग्नानंतर पूजा तिच्या नवऱ्याबरोबर ऑस्ट्रेलियात वेळ घालवत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज सिद्धेशच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीने खास पोस्ट शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पूजाने एक रोमँटिक व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा : मच्छी थाळी, समुद्रकिनारा अन्…; अभिज्ञा भावे नवऱ्यासह पोहोचली गोव्यात, सोबतीला आहे ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री

“ज्याच्यामुळे माझा प्रत्येक दिवस सुंदर होतो अशा माझ्या आयुष्यातील खास व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! आपल्या आयुष्यात पुढे वर्षानुवर्षे असाच आनंद येत राहो! Happy Birthday Siddy Boy” असं कॅप्शन देत पूजाने तिच्या नवऱ्याला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्रीने या व्हिडीओमध्ये त्यांच्या आयुष्यातील काही खास क्षण शेअर केले आहेत.

हेही वाचा : ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याने ‘लगान’मधील अभिनेत्रीसह केलंय काम! चित्रपट प्रदर्शित झालाच नाही, शेअर केला व्हिडीओ

पूजाप्रमाणे तिच्या भावंडांनी सुद्धा सिद्धेशला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. कमेंट सेक्शमध्ये अभिनेत्रीच्या चाहत्यांनी सिद्धेशवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. याशिवाय पूजा तिच्या नवऱ्याला ‘Siddy’ अशी हाक मारत असल्याचं या पोस्टचं कॅप्शन पाहून स्पष्ट होतं आहे.

दरम्यान, पूजा आणि सिद्धेशचं लग्न हे अरेंज मॅरेज पद्धतीत जमलं होतं. अभिनेत्रीचा नवरा कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो. अभिनेत्रीने तिच्या आणि सिद्धेशच्या नात्याबद्दल सर्वप्रथम गश्मीर महाजनीची बायको गौरीला सांगितलं होतं. यानंतर गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात जोडीदाराबरोबर फोटो शेअर करत पूजाने सर्वांनाच सुखद धक्का दिला होता. आता ही जोडी ऑस्ट्रेलियात सुखाचा संसार करत आहे.