छोट्या पडद्यावरील मालिकांमधून अभिनेत्री अभिज्ञा भावे घराघरांत लोकप्रिय झाली. ‘रंग माझा वेगळा’, ‘तुला पाहते रे’, ‘तू तेव्हा तशी’ अशा अनेक मालिकांमधून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. याशिवाय मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांबरोबर अभिज्ञाची घट्ट मैत्री आहे. सध्या अभिनेत्रीने शेअर केलेल्या अशाच एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अभिज्ञा काही दिवसांपूर्वी तिचा पती मेहुलबरोबर काश्मीर फिरायला गेली होती. आता अभिनेत्री गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. शूटिंगमधून वेळ मिळाला की, बरेच कलाकार सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गोव्याची वाट धरतात. अभिज्ञा सुद्धा तिच्या जवळच्या माणसांबरोबर व्हेकेशनचा आनंद घेत आहे.

हेही वाचा : ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याने ‘लगान’मधील अभिनेत्रीसह केलंय काम! चित्रपट प्रदर्शित झालाच नाही, शेअर केला व्हिडीओ

अभिज्ञा आणि मेहुलबरोबर आणखी एक मराठी अभिनेत्री गोव्याला पोहोचली आहे. ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री सायली संजीव अभिज्ञासह गोव्यात गेली आहे. नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये या दोघी मिळून गोव्यात धमाल करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : आधी रणबीरच्या ‘रामायण’ चित्रपटात एन्ट्री अन् आता कपूर कुटुंबीयांसह फोटोशूट! अजिंक्य देव यांची पोस्ट चर्चेत

गोव्यातील सुंदर समुद्रकिनारे, नारळाच्या बागा, तेथील खाद्यसंस्कृती विशेषत: मच्छी थाळी या सगळ्याचे फोटो अभिज्ञाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले होते. सायली आणि अभिज्ञामध्ये फारच सुंदर बॉण्डिंग असल्याचं हे फोटो पाहून लक्षात येत आहे.

हेही वाचा : प्रार्थना बेहेरेने का सोडली मुंबई? नवऱ्यासह ‘या’ ठिकाणी थाटला संसार; कारण सांगत म्हणाली, “अभिला सतत…”

अभिज्ञा भावे इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, दोघींच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अभिज्ञा सध्या हिंदी मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. याशिवाय सायली संजीवने शेवटचं ‘ओले आले’ चित्रपटात काम केलं होतं. आता तिचे आणखी काही चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.