जिओ स्टुडिओजचा बहुप्रतीक्षित ‘झिम्मा २’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाबरोबर ‘एक दोन तीन चार’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला. जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि ज्योती देशपांडे निर्मित एक नवीकोरी कथा असलेला ‘एक दोन तीन चार’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

‘एक दोन तीन चार’ हा चित्रपट आजच्या तरुण पिढीच्या आयुष्यात डोकावत प्रेम, लग्न अशा गोष्टींचा प्रवास कसा असू शकतो यावर आधारित आहे. एखाद्या विनोदाची अचूक पेरणी करत हलक्या फुलक्या पद्धतीने या चित्रपटातून मांडण्यात येणार आहे. या चित्रपटाचे वैशिष्टय म्हणजे ‘मुरांबा‘ या बहुचर्चित चित्रपटानंतर वरूण नार्वेकर दिग्दर्शित हा पुढील चित्रपट असणार आहे. तर या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद निपुण धर्माधिकारी आणि वरुण नार्वेकर यांनी मिळून लिहिले आहेत.
आणखी वाचा : Jhimma 2 Review: जीवाभावाच्या मैत्रिणींच्या रियुनियनची भावुक करणारी गोष्ट; वाचा कसा आहे ‘झिम्मा २’

main hoon na movie completed 20 years interesting facts
‘मै हूँ ना’ चित्रपटाची २० वर्षे : तब्बूचा काही सेकंदाचा कॅमिओ ते गौरी खानची पहिली निर्मिती, जाणून घ्या न ऐकलेले किस्से
marathi actor Makarand Anaspure appeared in the look of CM Eknath Shinde in the movie Juna Furniture
‘जुनं फर्निचर’ चित्रपटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या लूकमध्ये झळकले ‘हे’ प्रसिद्ध अभिनेते, पाहा फोटो
First glimpse of Kiran Gaikwad movie Dev manus released
‘देवमाणूस’ किरण गायकवाडच्या चित्रपटाची पहिली झलक प्रकाशित
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…

जिओ स्टुडिओजच्या या नव्या चित्रपटात कलाकारांची दमदार टीम दिसणार आहे. या चित्रपटातील मध्यवर्ती पात्र असलेल्या सायलीची भूमिका वैदेही परशुरामी ही साकारत आहे. तर समीरची भूमिका निपुण धर्माधिकारीनं साकारली आहे. याव्यतिरिक्त मृणाल कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, सतीश आळेकर, शैला घाणेकर, यांच्या देखील मुख्य भूमिका यात दिसणार आहेत. यानिमित्ताने वैदेही आणि निपुण ही नवीन जोडी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. तर या चित्रपटाच्या माध्यमातून निपुण धर्माधिकारी एक मोठी मध्यवर्ती भूमिका पहिल्यांदाच साकारताना दिसणार आहे.

आणखी वाचा : “मी फक्त…”, ‘झिम्मा २’ पाहिल्यानंतर निर्मिती सावंतच्या रिअल लाईफ सूनेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…

येत्या नवीन वर्षात ५ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती जिओ स्टुडिओज् बरोबर रणजित गुगळे, केयूर गोडसे, निपुण धर्माधिकारी आणि नीरज बिनीवाले यांच्या बहावा एन्टरटेन्मेंट आणि 16 बाय 64 यांनी केली आहे. आजच्या तरुण पिढीसोबतच सर्व वयोगटातील प्रेक्षकवर्गासाठी जिओ स्टोडिओजची ही नवं वर्षाची मनोरंजनाची खास ट्रीट ठरणार आहे.