मराठी चित्रपटसृष्टीत असे काही चित्रपट आहेत ज्यांनी चाहत्यांचा मनावर एक वेगळीच छाप उमटवली आहे. हे खास आणि जुने चित्रपट आजही चाहते तितक्याच आवडीने पाहतात. या चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे ‘झपाटलेला.’ १९९३ साली प्रदर्शित झालेला ‘झपाटलेला’ चित्रपट आजतागायत प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या चित्रपटात दिवंगत लोकप्रिय अभिनेते लक्ष्मीकांत बर्डे मुख्य भूमिकेत होते. शिवाय दिग्दर्शक महेश कोठारे, दिलीप प्रभावळकर हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत होते.

या अजरामर चित्रपटाच्या २० वर्षानंतर २०१३मध्ये ‘झपाटलेला-२’ प्रदर्शित झाला आणि तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. आता पुन्हा एकदा तात्या विंचू एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘झपाटलेला- मी तात्या विंचू’ या चित्रपटाचं पहिल पोस्टर रीलिज झालं आहे.

हेही वाचा… गर्भवती असूनही दीपिका पदुकोण करतेय ‘सिंघम अगेन’चं शूटींग, चित्रपटाच्या सेटवरील फोटो व्हायरल

आदिनाथ कोठारेने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर याबाबतची पोस्ट शेअर केली आहे. ‘झपाटलेला- मी तात्या विंचू’ याचं पोस्टर शेअर करत आदिनाथने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. या पोस्टरमध्ये तात्या विंचूचा अर्धा फोटो आणि आदिनाथ कोठारेचा अर्धा फोटो पाहायला मिळतोय.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोला कॅप्शन देत आदिनाथने लिहिलं, “हो हे खरं आहे. तात्या विंचू पुन्हा येतोय !!! २०२५ ला चित्रपटगृहात ! ओम फट स्वाहा !!!”

आदिनाथने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहे. साउथ फेम मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर कमेंट करत “ओह एम जी” म्हणाली, तर वैभव तत्त्ववादीने या सिनेमाला खूप शुभेच्छा देणारी कमेंट केली आहे.

हेही वाचा… VIDEO: ‘अमर सिंग चमकीला’ चित्रपटासाठी परिणीती चोप्रा पोहोचली सिद्धिविनायकाच्या चरणी

ईशा केसकर, तेजस्वीनी लोणारी, जयवंत वाडकर, अभिनय बेर्डे, मंजिरी ओक, प्रियदर्शन जाधव या मराठी कलाविश्वातील कलाकारांनी कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

“मी हा चित्रपट जरूर पाहणार . पण या चित्रपटात मला दोघांची खूप आठवण येईल, ती म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे आणि विजय चव्हाण.” अशी कमेंट एका चाहत्याने केली. “२०१३ पासून वाट पाहतोय … १२ वर्षांनी परत येणार” अशी कमेंट दुसऱ्या चाहत्याने केली.

दरम्यान, महेश कोठारे दिग्दर्शित ‘झपाटलेला- मी तात्या विंचू’ हा चित्रपट २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात आदिनाथ कोठारे महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याचं दिसून येतंय.