अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या ‘अमर सिंग चमकीला’चित्रपटामुळे चर्चत आहे. १२ एप्रिल २०२४ रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात परिणीतीबरोबर दिलजीत दोसांझदेखील आहे. परिणीतीने अभिनयाबरोबरच गायन क्षेत्रातही नुकतचं पदार्पण केलं आहे. या चित्रपटात अभिनेत्रीने अनेक गाणी गायली आहेत. या चित्रपटासाठी अभिनेत्री खास सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेली आहे. परिणीतीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘अमर सिंग चमकीला’ या चित्रपटासाठी परिणीतीने सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. १७ एप्रिल रोजी रामनवमीच्या मुहूर्तावर परिणीती सिद्धिविनायकाच्या चरणी नतमस्तक झाली. या खास दिवसासाठी परिणीतीने सफेद रंगाचा स्लीवलेस ड्रेस परिधान केला होता. खुले केस, मिनिमल मेकअप ठेवत परिणीतीने हा लूक पूर्ण केला आहे. अभिनेत्री मंदिरातून बाहेर परतताना बाप्पाचा फोटो घेऊन जाताना दिसली.

हेही वाचा… अदिती राव हैदरीने दिल्या होणाऱ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा; अभिनेत्री म्हणाली, “तू करत असलेल्या…”

परतण्याआधी या चित्रपटासाठी आणि तिच्या भूमिकेसाठी दिलेल्या प्रेमाबद्दल तिने चाहत्यांचे आभार मानले. यादरम्यान अभिनेत्री म्हणाली, “खूप खूप धन्यवाद, तुम्ही लोकांनी ‘अमर सिंग चमकीला’ला खूप प्रेम दिले आहे.” परिणीतीने मुलांना लाडू वाटप केले.

परिणीतीने पापाराझींना मिठाईदेखील वाटली. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. परिणीतीच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत.

हेही वाचा… “आई तू लग्न कधी करणार?”, अरहान खानने मलायका अरोराला प्रश्न विचारताच अभिनेत्री म्हणाली…

इम्तियाज अलीने दिग्दर्शित केलेला बायोपिक ‘अमर सिंग चमकीला’ चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट पंजाबमधील गायक अमर सिंग चमकीला यांच्या जीवनावर बेतलेला आहे. त्यांची गोळ्या झाडून २७ व्या वर्षी हत्या करण्यात आली होती. १२ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात दिलजीत दोसांझने अमर सिंग चमकीला तर परिणीती चोप्राने त्यांची पत्नी अमरजोतची भूमिका केली आहे. झोया अख्तर, हंसल मेहता आणि करीना कपूरसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी या चित्रपटाचे कौतुक केले.