लवकरच आई होणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण नुकतीच ‘सिंघम अगेन’च्या सेटवर दिसली. ‘गुड न्यूज’ दिल्यानंतर पहिल्यांदाच दीपिकानं तिचं बेबी बंप दाखवलं. आगामी चित्रपटासाठी ॲक्शन सीक्वेन्सचं शूटिंग करण्यासाठी अभिनेत्री पोलिसांच्या गणवेशात सेटवर आली होती. याचे फोटोज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

पोलिसांचे खाकी कपडे, केसांचा बन, डोळ्यांवर ग्लासेस अशा लूकमध्ये अभिनेत्री सेटवर सज्ज झाली होती. दीपिकाने एक सीन शूट केला; ज्यामध्ये गुंडांच्या पोशाखात अनेक पुरुष होते.

हेही वाचा… “आई तू लग्न कधी करणार?”, अरहान खानने मलायका अरोराला प्रश्न विचारताच अभिनेत्री म्हणाली…

हाय वेस्ट पॅन्ट आणि मोठा बेल्ट लावून अभिनेत्रीनं बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न यात केला गेला आहे, असं दिसतंय. दीपिका पदुकोणच्या फॅन पेजेसवरून हे फोटोज शेअर झाले होते. या फोटोजमध्ये दीपिकाच्या फाईट सीन्सपूर्वी अभिनेत्री दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि स्टंट टीमच्या सदस्यांकडून सूचना घेताना दिसते आहे.

दीपिका प्रेग्नंट असल्यानं तिच्या फायटिंगचे सीन ती करणार नसून, तिच्याऐवजी स्टंट्स करणारी दुसरी व्यक्ती असेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. शूटिंगच्या ठिकाणी दीपिकासारखेच कपडे आणि हेअरस्टाईल असणारी व्यक्ती तिथे उपस्थित होती. तेव्हा दीपिकाचं शूटींग सुरू होतं. ‘सिंघम अगेन’ चित्रपटाद्वारे दीपिका पहिल्यांदाच पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात शक्ती शेट्टी ही भूमिका साकारत लेडी सिंघम म्हणून दीपिका रोहित शेट्टीच्या पोलिसी संघात सामील झाली आहे.

हेही वाचा… लवकरच आई होणाऱ्या दीपिका पदुकोणने सुरू केलं भरतकाम; अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली…

‘सिंघम अगेन’चं चित्रीकरण गेल्या वर्षी हैदराबादमध्ये सुरू झालं. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दीपिका पदुकोणसह या चित्रपटात अजय देवगण, रणवीर सिंग, करीना कपूर-खान, अक्षय कुमार टायगर श्रॉफ हे कलाकार मुख्य भूमिकांत झळकणार आहेत.

हेही वाचा… “लग्नानंतरचं सुख”, पत्नी क्षितिजाने केली प्रथमेश परबच्या डोक्याची मालिश, अभिनेता व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

दरम्यान, दीपिका पदुकोणच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचं झालं तर, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी १४ नोव्हेंबर २०१८ रोजी लग्नगाठ बांधली. २९ फेब्रुवारीला या कपलनं प्रेग्नन्सीची ‘गुड न्यूज’ चाहत्यांबरोबर शेअर केली होती. लग्नाच्या सहा वर्षांनंतर दीपिका व रणवीर आई-बाबा होणार आहेत. सप्टेंबरमध्ये त्यांच्या गोंडस मुलाचं आगमन होणार असल्याच्या चर्चा आहेत.