मराठीतील दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक नाव म्हणजे दिग्दर्शक केदार शिंदे. केदार शिंदे हे महाराष्ट्रातील घराघरात ओळखले जाणारे नाव आहे. शाहीर साबळे हे केदार यांचे आजोबा आहेत. आजोबांचा वसा सांभाळत केदार शिंदे यांनी मराठी नाट्यभूमी, मालिका विश्व आणि सिनेमा क्षेत्र अशा तिन्ही माध्यमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. दिग्दर्शक केदार शिंदे कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित एक चित्रपट घेऊन येणार आहेत. या चित्रपटाचे नावं ‘महाराष्ट्र शाहीर’ असे आहे. अंकुश चौधरी यात शाहीर साबळेंची भूमिका करत आहे.

नुकतीच दिग्दर्शक केदार शिंदे यांनी चित्रपटातील आणखीन एका व्यक्तिरेखेबद्दलची माहिती देणारी पोस्ट शेअर केली आहे. ती व्यक्तिरेखा म्हणजे ‘भानुमती कृष्णराव साबळे’ म्हणजे शाहिरांची ‘पत्नी’. महत्त्वाचे म्हणजे शाहिरांच्या पत्नीच्या भूमिकेत पहिल्यांदाच आपल्याला बघायला मिळणार आहे ‘सना केदार शिंदे’. दिग्दर्शक केदार शिंदे यांची कन्या. पोस्टमध्ये ते असं म्हणाले, ‘आज ३ सप्टेंबर, शाहीर साबळेंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पहिल्या दिवशी सादर करीत आहोत शाहीरांच्या आयुष्यातलं गोड गाणं. सौ. भानुमती कृष्णराव साबळे आणि भानुमती यांच्या भूमिकेत पदार्पण करीत आहे त्यांची पणती ‘सना केदार शिंदे’. पणजीच्या भूमिकेत पणती’.

Director Bhaurao Karhade announced his new film Fakira
मराठी साहित्यातलं मानाचं पान ‘फकिरा’ रुपेरी पडद्यावर
cannes film festival, FTII, short film,
प्रतिष्ठित कान चित्रपट महोत्सवात पुण्याच्या एफटीआयआयचा लघुपट
Kiritkumar Shinde Resigns From MNS
कीर्तिकुमार शिंदेंचा मनसेला अलविदा! पोस्ट शेअर करत म्हणाले, “राज ठाकरेंच्या अनाकलनीय भूमिकांचं..”
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”

दिग्दर्शक केदार शिंदे स्वतः एक उत्कृष्ट लेखक, अभिनेता, दिग्दर्शक, गायक आहेत. आता त्यांची मुलगी देखील चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. मराठीत देखील आता स्टार किड्स येत आहेत. केदार शिंदे यांची पत्नी बेला शिंदे यादेखील निर्मिती क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाचे निर्माते संजय छाब्रिया असून या चित्रपटाची पटकथा व संवाद प्रतिमा कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. या चित्रपटातील संगीत महाराष्ट्राचे लाडके गायक अजय- अतुल यांनी दिले आहे. हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.